pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पाहेगाव येथील उपसरपंच सुरेश चव्हाण व ग्रां.प. सदस्य तथा माजी उपसरपंच राजू तळेकर यांचा भाजपात प्रवेश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.3

माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जालना तालुक्यातील मौजे पाहेगाव येथील उपसरपंच श्री.सुरेश चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच श्री.राजू तळेकर यांनी कॉंग्रेस मधून भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, भाजपामध्ये आपले हार्दिक स्वागत… येणाऱ्या काळात प्रामाणिकपणे जनतेची सेवा करा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अनेक जनकल्याणकारी योजना मंजूर केल्या आहेत या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला करून देऊन आपल्या गावात एकही लाभार्थी लाभापासूनवंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी व पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे असे हि सांगितले.

यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, तालुकाध्यक्ष वसंत शिंदे, मुकेश चव्हाण, संजय डोंगरे, निवृत्ती लंके, राजभाऊ कळकुंबे, दत्ता जाधव, संतोष राठोड आदींची उपस्थिती होती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे