pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.4

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र, आयएमए जालना, निमा वैद्यकीय व्यावसायिक व ओएचसी यांचा कार्यक्रमात सहभाग वाढविण्याकरीता कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवनात दि.4 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन व डॉ.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन करण्यात आले.
कार्यशाळेत प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच टीबी आजार आरोग्याची सार्वजनिक समस्या असुन त्याचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेऊन क्षयरोग निर्मुलनासाठी प्रयत्न करावेत, असेही सांगितले. कार्यशाळेस जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जी.एम.कुडलीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.राजेंद्र गाडेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल सोनी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गजानन मस्के, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ.कौस्तव दासगुप्ता, स्टेट टेक्नीकल सपोर्ट युनिच्या डॉ.गिरीजा ठाकुर, नोडल ऑफिसर डॉ.जहिर शहा, आयएमए सचिव डॉ.अनंत बोरीवाले, निमा संघटनेचे सचिव डॉ.कच्छवा, वैद्यकीय अधिकारी डॉ.परशुराम नागदरवाड आदिंची उपस्थिती होती. कार्यशाळा यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे