pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकानासाठी आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 6 

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने सन 2024-25 साठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही जालना येथील महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्यादीत यांच्या स्तरावरुन सुरु करण्यात आली आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल https://register.mshfdc.co.in ही लिंक दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे