pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्ह्यात इयत्ता बारावी परिक्षेत कॉपीचे 11 गैरप्रकार

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.12

महाराष्ट्र राज्य माध्यकमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता 12 वी  परीक्षेला  कालपासून सुरुवात झाली आहे. दि.11 फेब्रुवारी, 2025 ते दि. 18 मार्च, 2025 या कालावधीत जालना जिल्ह्यातील एकुण 82 उपकेंद्रावर इयत्ता 12 वीच्या परीक्षा पार पडणार आहेत. राज्य शासनामार्फत 12वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे विशेष अभियान चालवले जात आहे. त्यासाठी, जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी  ही या संदर्भात कठोर अमंलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दि. 11 फेब्रुवारी, 2025 रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली असुन, सदर परीक्षे दरम्यान श्रीमती इं‍दिरा गांधी विद्यालय रामनगर सा. केंद्र क्रमांक 418 वर 03 कॉपीचे गैरप्रकार, सत्य शोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव ता. भोकरदन केंद्र क्रमांक 492 वर 04 कॉपीचे गैरप्रकार तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बदनापुर केंद्र क्रमांक 428 वर 2 कॉपीचे गैरप्रकार निदर्शनास आले.

तसेच आज (दि.12 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या हिंदी विषयाच्या परीक्षे दरम्यान  सिध्देश्वर उच्च  माध्यमिक विद्यालय ढोकसाळ मंठा ता. मंठा येथे 2 कॉपीचे गैरप्रकार झाल्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परीषद, जालना यांच्यामार्फत विभागीय सचिव विभागीय मंडळ कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सादर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे