pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.13

जिल्ह्यात “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान, कुष्ठरोग निवारण दिन व जनजागृती पंधरवाडा दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. कुष्ठरोगविषयक संदेश जनसामान्यांपर्यत पोहोचवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हास्तरीय खुली “रन फॉन लेप्रसी” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातून “रन फॉन लेप्रसी” मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होवून सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद मार्गे अंबड चौफुली, सतकर कॉम्प्लेक्स ते जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयात मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला.
सहभागी स्पर्धकांमधुन पुरुष गटात वैभव राजेंद्र शिंदे, आकाश रामेश्वर राठोड, सचिन मोहन चव्हाण यांची अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली. तसेच महिला गटात प्रियंका लालसु ओकसा, शुभांगी वैजिनाथ म्हसलेकर, वैष्णवी बळीराम सोनटक्के यांची अनुक्रमे प्रथम, व्दितीय तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली. त्यांना रोख रक्कम पुरुष व महिला गटास अनुक्रमे 4 हजार रुपये, 2 हजार 500 रुपये, 1 हजार 500 रुपये व प्रशस्तीपत्र याप्रमाणे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के, डॉ. एन.जी. पवार, वैद्यकिय अधिकारी डॉ. आर.यु. काकड, डॉ. जिल्हा हिवताप अधिकारी राहुल राऊत, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सुधाकर शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्षा कड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयातील कर्मचारी एस.डी. सावंत, एन.जे.मगर, एस.जी. शेख, सुंदर देवकते, दत्ता डाके, डॉ. रोहन ठोंबरे, श्रीमती मुंदडा, अश्विनी दांड, फेरोज पठाण, प्रशांत दहीभाते, अश्विनी बदर तसेच जिल्हा हिवताप कार्यालय व जिल्हा क्षयरोग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चक्रधर बागल यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे