pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

योगेश नगर येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह; भक्तीमय वातावरणात ह.भ.प. भागवत महाराज काळबांडे यांचे कथा प्रवचन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.16
जालना शहरातील अंबड रोडवरील योगेश नगर येथे दि. 13 फेब्रुवारी 2025 पासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्यात आला आहे. ह.भ.प. भागवत महाराज काळबांडे हे रोज भक्तीमय वातावरणात कथा प्रवचन देत आहेत. या सप्ताहाची सांगता दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून या दिवशी आमदार अर्जुनराव खोतकर यांचा सत्कार सोहळा देखील होणार आहे अशी मागणी संस्थापकीय अध्यक्ष सुधाकर सोनार यांनी रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता दिली.
अशोक महाराज पाथ्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश नगर येथे श्री गजानन महाराज मंदीर संस्थानच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दैनंदीत धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यामध्ये दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी श्री. ह.भ.प. महंत महादेव महाराज गिरी यांचे किर्तन झाले. तर दि. 14 फेब्रुवारी रोजी श्री. ह.भ.प. एकनाथ महाराज जाधव यांचे, दि. 15 फेब्रुवारी रोजी श्री. ह.भ.प. अ‍ॅड. समाधान महाराज लोखंडे, दि. 16 फेब्रुवारी रोजी श्री. ह.भ.प. भागवत महाराज नखाते यांचे किर्तन झाले असून दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी ह.भ.प. कु. योगीताताई देवकर, दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी ह.भ.प. सौ. शारदाताई महाराज मापारी, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी ह.भ.प. पंकज महाराज थोरे यांचे किर्तन होणार आहे.
रोज दुपारी 1 ते 5 वाजेपर्यत ह.भ.प. भागवत महाराज काळबांडे यांचे श्रीमद् भागवत कथा होत आहे. या श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहासाठी संस्थापकीय अध्यक्ष सुधाकर सोनार, इंजि. पदमाकर काटकर, अविनाश खांडेकर,चंद्रभान खांडेकर, विजय लोणकर, अ‍ॅड. महादेव साखरे, अशोक पवळ, पद्माकर काकडे, हरीभाऊ गजर, रविंद्र रामदासी, फकीरा वाघ हे परिश्रम घेत आहेत. या सप्ताहाची सांगता दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून आमदार अर्जुनराव खोतकर यांचा त्याच दिवशी सत्कार सोहळा होणार असून या कार्यक्रमाला ह. भ. प. नानासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे