बाळ गोपाळ मित्र मंडळाने साजरा केला शिवजन्मोत्सव
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
बाळ गोपाळ मित्र मंडळ (सिडको कॉलनी बोकडवीरा ) यांनी शिवजन्मोत्सव २०२५ या निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम सिडको कॉलनी, सेक्टर ३०, बोकडवीरा उरण येथे आयोजित केले होते या कार्यक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.लोहगड ते सिडको कॉलनी द्रोणगिरी सेक्टर ३० शिवजोत यात्रा आणली गेली.विशेष म्हणजे नॉन स्टॉप लोहगड ते बोकडविरा उरण पर्यंत धावत शिवज्योत फक्त ५ तासात आणली गेली. यावेळी बाळ गोपाळ मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.मागील वर्षा प्रमाणे या वर्षीही सर्वांत छोटे मंडळाचे कार्यकर्ते यांचा उत्साह पाहण्या सारखा होता. पियूष प्रवीण सावंत वय वर्ष १२, साई सनिदेव पार्टे वय वर्ष १०,विघ्नेश विकास सावंत वय वर्ष १०, कार्तिक विकास सावंत वय वर्ष ७, राजवीर गणेश चव्हान वय वर्ष १० या शिवभक्तांनी पुढाकार घेत शिवजन्मोत्सव साजरा केला.वक्तृत्व स्पर्धा,चित्र कला स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा,छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक( सिडको कॉलनी ते मल्हार चौक),पावनखिंड चित्रपट प्रदर्शन, भजन, महाप्रसाद आदी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले.मिरवणूकप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच त्यांचासह द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर , उपशहर प्रमुख प्रतिक पाटील,धनंजय शिंदे, सचिव रूपेश पाटील, द्रोणागिरी विभाग प्रमुख व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांचीही उपस्थिती लाभली.यावेळी बाळ गोपाळ मित्र मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.


