pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अंगणवाडी सेविका होणार बेमुदत संपात सहभागी; मानधन नको वेतन हवे ही मागणी लावून धरणार

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.26

अंगणवाडी सेविका होणार बेमुदत संपात सहभाग. मानधन नको वेतन हवे ही मागणी लावून धरणार येत्या चार डिसेंबर सोमवार पासून पासून अंगणवाडी सेविका यांचा बेमुदत संप होणार असून “मानधन नको वेतन हवे”, ही मागणी घेऊन हा संप पुढे घेऊन जाणार असून त्यांना मिळणारे मानधन हे दिल्या जाणाऱ्या सेवांच्या प्रमाणात अत्यल्प स्वरूपाचे असून अनियमित दिले जात असल्याने व कोणत्याही प्रकारचा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकाला दिला जात नाही. त्याची तरतूद असून देखील,मानधन 2,3 टप्पे करून आणि एकाच अकाउंटला जमा न करता नवीनच प्रकारे वेगवेगळ्या अकाउंटला टाकण्यात येत आहे जेणे करून सेवकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू असल्याने सर्व अंगणवाडी सेविका चार डिसेंम्बर सोमवार पासून बेमुदत संपात सहभागी होनार असून त्याचे जाहीर निवेदन दि 24/11/2023 ला. कार्यलय जाफ्राबाद येथे एस डी पी ओ,(बाल विकास प्रकल्प अधिकारी ) साहेबांना देण्यात आले आहे . त्यात ऑक्टोम्बर 2023 च्या मासिक प्रगती अहवाल रिपोर्ट देण्यास नकार देण्यात आला आहे, सदरील निवेदन सर्व तालुक्यातील सेविकांच्या वतीने सिटू संघटणेच्या जिल्हा कमिटीच्या सदस्य श्रीमती राही वाघ यांच्या हस्ते श्री साळवे सर यांच्या सह जाफ्राबाद येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी एस डी पी ओ) यांना देण्यात आले. या वेळी अंगणवाडी सेविकाही उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे