pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भारतीय संविधान टिकेल तर देश टिकेल- आ. कैलास गोरंट्याल

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.26
भारतीय संविधानामुळे देशातील लोकशाही अबाधित राहणार असल्यामुळे भारतीय संविधान टिकविणे अत्यंत गरजेचे आहे हि बाब देशातील तरूणानी लक्षात घेणे गरजेचे असून यासाठी अत्यंत जागृत राहण्याची गरज आह असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.
जालना जिल्हा शहर काँग्रेस कमटीच्या वतीने 26 नोव्हेंबर रविवार रोजी भारतीय सविधान दिनानिमित्त मस्तगड येथे संविधान  स्तंभ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शेख महेमुद, प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जालना शहर काँग्रेस ब्लाँक कमिटीचे अध्यक्ष वैभव उगले आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री गोरंट्याल म्हणाले की, देशाची लोकशाही धोक्यात आली आहे म्हणून भारतीय संविधान टिकविणे हि काळाची गरज आहे. यासाठी विशेष करून तरूणाला जागृत राहण्याची आवश्यकता आहे. देशाचे संविधान टिकले तर देश टिकेल हि भावना सर्वांनी आत्मसात केली पाहिजे असे श्री गोरंट्याल म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि संविधान स्तंभास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी धर्मा खिल्लारे, अ. बासेद कुरेशी, अण्णा सावंत, चंदाताई भांगडीया, अंजली सपकाळ, ज्ञानेश्‍वर कदम, विभा लाखे, नारायण वाढेकर, अरूण मगरे, दत्ता घुले, शेख ईर्शाद, आनंद वाघमारे, सुभाष कोळकर, शामराव लांडगे, ज्ञानेश्‍वर धानुरे, अ. रहेमान बेनिवाल, बाबासाहेब सोनवणे, शेख शमशोद्यीन मोमिन, कुदरत खान, कलीम खान, गणेश चांदोडे, अजिम बागवान, जावेद अली, बालकृष्ण कोताकोंडा, बद्री जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे