सी.एच.ए आधार चषक २०२५ उत्साहात संपन्न
स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेली रक्कम समाजकार्यासाठी वापरणार.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4
उरण तालुक्यातील पूर्व विभागातील सतत होत असलेल्या अपघातग्रस्त सी.एच.ए बंधूंच्या मदतीसाठी व समाजातील इतर अपघातग्रस्तांना निधी उपलब्ध व्हावा तसेच उरण विभागात विविध सामाजिक कार्ये करण्याच्या दृष्टीकोनातून न्हावा शेवा सी.एच.ए आधार सामाजिक संस्थे तर्फे दरवर्षी सी.एच.ए आधार चषकाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी धोंडूकाका मैदान, पिरकोन ,तालुका-उरण येथे एक दिवसीय सी.एच.ए आधार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .उरण तालुक्यातील अपघातग्रस्त सीएचए बधूंच्या तसेच समाजातील इतर अपघात ग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या सीएचए आधार चषकाला यावर्षीही मान्यवर, खेळाडू, रसिक प्रेषक वर्गांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे .अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातील एकमेव संघटना असून क्रिकेट क्षेत्रात या न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेने एक नवा आदर्श समाजासमोर, खेळाडूंसमोर, क्रीडा रसिक प्रेषकांसमोर उभा केला आहे.अशा या सीएचए आधार चषकाला रसिक प्रेषक, खेळाडूंनी, विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या आधार चषक क्रिकेट स्पर्धेवेळी चूरशीचा सामना पाहावयास मिळाला.या स्पर्धेत प्रथम क्रमांक -१४१६ वॉरियर्स (गोवठणे) तर द्वितीय क्रमांक – साई भोळा इलेव्हन (आवरे) यांनी पटकाविला आहे.सदर या क्रिकेट स्पर्धेतून मिळणारी सर्व रक्कम ही सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार आहे.
यावेळी महेश बालदी (आमदार उरण विधानसभा), कामगार नेते महेंद्र घरत(रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष),राजू मुंबईकर- महाराष्ट्र भूषण( केअर ऑफ नेचर संस्था),विनोद म्हात्रे(उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष),रुपेश पाटील( शिवसेना उरण तालुका उपसंघटक),नरेंद्र मुंबईकर (माजी सरपंच-वैश्वि),सत्यवान भगत- (मनसे तालुकाप्रमुख),धनंजय म्हात्रे(जय जनार्दन क्रियेशन्स), डॉ.हिराचंद पाटील,परेश ठक्कर(BCBA Sr.Voice President), विनायक अपराज (BCBA Voice President),भारतदादा भोपी (माजी सरपंच दुंदरे),जीवन म्हात्रे (माजी जिल्हा परिषद सदस्य),मुकुंद गावंड( भाजपा उपाध्यक्ष-उरण तालुका),अजित म्हात्रे(उरण-पनवेल पर्यावरण विभाग अध्यक्ष),देवेंद्र पाटील(उद्योजक खोपटे),गुरुराज ठाकूर (सरपंच केळवणे),शशिकांत पाटील( उरण पूर्व विभाग भाजपा-अध्यक्ष),मंगेश म्हात्रे(माजी सरपंच पिरकोन),सुदेश पाटील (श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था अध्यक्ष ) आदि मान्यवरांनी भेट देऊन सदर क्रिकेट स्पर्धेचे कौतुक केले आहे.


