प्राथमिक आदर्श केंद्रशाळा चिरनेर चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 14
रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा चिरनेरचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दानशूर उद्योगपती राजाशेठ खारपाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणपती, सरस्वती आणि हिंदवी स्वराज्याचे छत्रपती , रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आणि दिप प्रज्वलनाने झाली.
यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक राजाशेठ खारपाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी उद्योगपती राजाशेठ खारपाटील, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा रायगड जिल्हा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद खारपाटील, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, माजी सभापती शुभांगी पाटील, ग्रामपंचायत सदस्य पद्माकर फोफेरकर, निकिता नारंगीकर, निलम चौलकर, भारती ठाकूर,उरण इंटक चे अध्यक्ष राजेंद्र भगत, सेवानिवृत शिक्षक अशोक कांबळे, आदर्श शिक्षिका चैताली म्हात्रे,शिवसेना नेत्या ज्योती म्हात्रे, शाळा व्यवस्थापन कमिटी चे अध्यक्ष सचिन म्हात्रे, माजी अध्यक्ष प्रवीण म्हात्रे,शाळा व्यवस्थापन कमिटी चे सदस्य गजेंद्रसिंग राजपुरोहित, मुख्याध्यापक विश्वनाथ गावंड आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी दानशूर उद्योगपती, चिरनेर चे विकासपुरुष,ज्यांनी चिरनेर मध्ये ज्ञानाची गंगा आणली त्या राजाशेठ खारपाटील यांनी शाळेच्या कंपाऊंड ला आकर्षक रंगरंगोटी करण्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी त्यांनी शाळेतील मैदानात चिखल होऊ नये म्हणून खडी टाकली होती.
आय एस ओ आदर्श शाळा पुरस्कृत शाळेतील छोट्या छोट्या बच्चे कंपनीने अतिशय सुरेख नृत्य सादर करून उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली. स्वागतगीत, गणेशवंदना, मंगळागौर खेळू या ,पाणी लाटा ,लुंगी डान्स, राजे , मंगळा गौर खेळू या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी पालक ग्रामस्थ यांना खुर्चीस खिळून ठेवले होते .प्रत्येक गाण्यानंतर टाळ्या आणि वन्स मोअर ची मागणी होत होती. शिक्षकांनी या लहानग्या छोट्या विद्यार्थ्यांची सुरेख अशी तयारी केल्याचे दिसून आले. स्नेहसंमेलनात विद्यार्थी , पालक ,ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात बच्चे कंपनी ने केलेल्या उत्कृष्ट नाच गाण्यास प्रतिसाद, अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.यावेळी माजी सहशिक्षक तुषार ठाकूर, नीलम ठाकूर यांनाही सन्मानित करण्यात आले.


