pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांग, वृध्द निराधारांच्या हक्कासाठी बिलोली येथे मेळाव्यास प्रपंच प्रतिसाद अति उत्साहात संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी,दि 23

बिलोली पंचायत समिती सभागृह येथे दिव्यांचा, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी व अनेक मान्यवराच्या ऊपस्थित खेडोपाड्यात राहाणारे दिव्यांचा,वृध्द, निराधार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्याअध्यक्षतेखाली का्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.गोंविदराव मुंडकर, जेष्ठ पत्रकार मां.माधवराव अटकोरे,संस्थापक अध्यक्ष , अर्पण अवयवदान समिती नांदेड,
प्रमुख उपस्थिती मा स्वामी सर सहपोलिस निरीक्षक बिलोली,मां. नरसिंग निमलवाड आगार व्यवस्थापक बिलोली,मां.कमलाकर जमदाडे, संपादक लोकसेवा न्यूज, मां.शहाजी वरखिंडे संपादक शिवगर्जना न्युज,मां.आरिफ शेख संपादक महाराष्ट्र २४ न्यूज, मां.मुस्ताफा पिंजारी पत्रकार संरक्षण ता.सचिव मुखेड, मां.रामप्रसाद चनावार जेष्ठ पत्रकार मा.दिव्यांग सं.जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि.संपर्क प्रमुख मा.नागोराव बंडे पाटिल, जि.
ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, माहुर ता.अध्यक्ष उमेश भगत, मुखेड ता.अध्यक्ष मगदुम शेख ऊंद्रीकर, दत्तात्रय सोनकांबळे,
इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत इत्यादी मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे यांनी दिव्यांग वृध्द निराधार बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली आपण शासन प्रशासन जागे करण्यासाठी अनेक निवेदन आंदोलन केल्यामुळे अनेक लाभ मिळत आहेत अनेक प्रश्नांसाठी प्रशासकिय अधिकारी यांनी खऱ्या ईश्वररूपि दिनदुबळ्याच्या प्रश्नाला न्याय द्यावा व न्यायासाठी सर्वांनी संघटित संघर्षासाठी सहभागी व्हा असे आव्हान केले.
प्रमुख व्यक्ते मां.गोंविदराव मुंडकर यांनी ईश्वररूपि दिनदुबळ्याच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून चंपतराव डाकोरे पाटिल अनेक दिवसांपासून करीत असलेली चळवळ मी ऐकत होतो पण आज मी प्रत्यक्ष मेळाव्यास उपस्थित राहुन भर ऊन्हात आपण खेड्यातुन दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी मोठ्या संख्येनी मेळाव्यास हक्कासाठी डाकोरेच्या साथीला असल्याचे पाहून मला दिनदुबळ्याच्या मेळाव्यास योग्य ठिकाणी मी आलो असे मला वाटते हि लढाईसाठी आपण दिव्यांगाची पर्वा न करता सतत डाकोरेच्या सोबत संघर्षासाठी संघटित झाल्याशिवाय काहि मिळत नसल्यामुळे सर्वांनी एकजुटीने आपल्या हक्कासाठी संघटित व्हा , कोणत्याही अडचणींना आवाज द्या मी आपल्या सोबत असल्याचे मत व्यक्त केले.
मां. सहपोलीस निरिक्षक यांनी दिव्यांग कायदा २०१६ घ्या कलम ९२ ची अंमलबजावणी होत आहे मी कोणत्याही पोलिस स्टेशन ला असलो तरी मी आपल्या अडचणी नियमानुसार सोडविण्याचे आश्वासन दिले.
मां.आगार व्यवस्थापक साहेब यांनी दिव्यांगासाठी बस प्रवासात जी जागा आरक्षित आहे त्या जागा वाहकांनी दिव्यांगाना उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले पण वाहक जर आपणास सहकार्य जागा उपलब्ध करून देत नसतील तर माझ्याशी फोनवर संपर्क करा मी आपणास नियमानुसार सेवा देण्याचे आश्वासन दिले.
मा. कमलाकर जमदाडे यांनी अंधश्रद्धा म्हणून फसवेगीरी कशी होते त्यांचे उदाहरण कृतितुन दाखवून दिले त्यामुळे आपण फसवणुकीपासून सावध राहाण्याचे आव्हान केले.
जेष्ठ पत्रकार तथा अर्पण अवयवदान समिती नांदेड चे संस्थापक अध्यक्ष मा.माधवराव अटकोरे यांनी सर्वांना टोप्या देऊन अवयदान बदल माहिती दिली जिवंत असताना आपण एकमेकांना सहकार्य केले.पण मृत्यूनंतर आपले अमुल्य अवयवदानामुळे एखाद्याचे जिवन वाचु शकते म्हणून अवधान माती मिळण्याऐवजी अवयवदान करण्याचे आव्हान केले.
अध्यक्षिय भाषण मा.चंपतराव डाकोरे यांनी दिव्यांगानी संघटितपणे संघर्ष केल्यामुळे अनेक सवलती मिळत आहे.अनेक सवलतीसाठी आपण संघटित संघर्षासाठी एकत्रित येणार नाहि दिलेली माहिती पाहात नाहि एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय हक्क मिळत नसल्यामुळे सर्वांनी एकजुटीने संघर्षात सहभागी व्हावे असे आव्हान केले.
पुढील दिशा रननिति संघटितपणे संघर्षासाठी दिव्यांग वृध्द, निराधार बांधवांना माहिती दिली जाईल आपण नेहमी मेळ ऊपस्थित राहावे.
या.कार्यक्रमास
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी
बिलोली ता.अध्यक्ष बालाजी होनपारखे, नायगाव ता अध्यक्ष विठ्ठल बेलकर,मुखेड ता अध्यक्ष मगदुम शेख ऊंद्रीकर, ऊमरी ता.अध्यक्ष गजानन वंहिंदे, माहुर ता.अध्यक्ष उमेश भगत, हदगाव ता.अध्यक्ष नामदेव बोडके, अर्धापूर ता.अध्यक्ष दिंगाबर लोणे,लोहा ता.अध्यक्ष शेख हानिफ, कंधार ता.अध्यक्ष चांदु गवाले,देगलुर ता. अध्यक्ष रवि ठाकुर नांदेड ता.अध्यक्ष शेख मुस्तफा,किनवट ता.अध्यक्ष अंकुश राठोड महिला ता.अध्यक्ष बालीताई जंगनवाड,सविता नांदेड, नांदेड,तालुक्यातील सचिव शंकर म्हैत्रे,दत्तात्रय सोनकांबळे, रावसाहेब बसवदे,चांदराव चव्हाण,हानमंत हेळगिरे,बिलोली ता.ऊप अध्यक्ष गोपाळ अडबलवार ता.सचिव शंकर म्हैत्रे ता.सहसचिव संतोष नरवाडे कोषअध्यक्ष रामजी गायकवाड वृध्द ता.अध्यक्ष दिंगांबर तरटे,लालु वाघमारे, राजु श्रीरामे, पिराजी पंदिलवाड, इत्यादी शेकडो बांधव पदाधिकारी उपस्थित होते
असे प्रसिध्दी पत्रक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र ता. अध्यक्ष बालाजी होनपारखे सचिव शंकर म्हैत्रे यांनी दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे