जालना शहर महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनेरी नगर येथे महिला स्वच्छालय व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करा – सौ संध्या संजय देठे
जालना/प्रतिनिधी, दि.25
जालना शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे या ठिकाणी जवळपास 20 अधिकारी व महिला नर्स कर्मचारी कार्यरत आहे
दिवसातील जवळपास शेकडो महिला पुरुष आरोग्य तपासणीसाठी येतात परंतु या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असून महिला कर्मचाऱ्यासाठी पिण्याचे पाणी व स्वच्छालय व्यवस्था नाही परिणामी महिला कर्मचारी व पेशंटला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून माननीय आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांनी मोबाईलद्वारे संभाषण करून व निवेदन देऊन स्वच्छता व स्वच्छालय समस्या दूर करण्याची मागणी केली आहे
—————————————————————
नवीन स्वच्छालय बांधकाम होईपर्यंत मोबाईल टॉयलेट व्हॅन आरोग्य केंद्रात उभी करावी.
सौ संध्या देठे यांची मागणी


