pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासन, सर्व शैक्षणिक संस्था, एनएसएस, एनसीसी, एनवायके व इतर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जयभिम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना शहरात देखील जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा परिषद, विविध क्रीडा संघटना, मंडळे यांच्या विद्यमाने दि. 13 एप्रिल, 2025 सकाळी 07.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा (नुतन वसाहत) येथे माळा अर्पण करून पदयात्रेची सुरुवात होणार आहे. ही पदयात्रा  शनि मंदीर – गांधी चमन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (मस्तगड) यांच्या पुतळ्यास माळा अर्पण करून पुर्ण होणार आहे. या पदयात्रेस जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे.

जिल्‌ह्यातील शाळा/महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह, एनएसएस, एनसीसी, स्काऊट/गाईडस विद्यार्थी तसेच सर्व क्रीडा संघटना पदाधिकारी व खेळाडू यांनी पदयात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जालना यांचेवतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे