गेवराई शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
भव्य शोभा यात्रेने गेवराई शहर दुमदुमून गेले
गेवराई/प्रतिनिधी, दि.6
गेवराई शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची 894 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये निबंध स्पर्धा,रक्तदान शिबिर व व्याख्यान तसेच वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दि.04 रोजी सकाळी आठ वाजता गेवराई शहरातील मेनरोड येथील रेणुका देवी मंदिरातून ही भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभयात्रेमध्ये बालगोपालांसह महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्या तर पुरुषांनी पांढऱ्या रंगाचा वेश परिधान करून या शोभयात्रेत सहभागी झाले होते. या शोभा यात्रेमध्ये पुढे बँड पथक होते त्या मागे अतिशय शिस्ती मध्ये वीरशैव महिला भजन करत होत्या. सजवलेल्या रथामध्ये महात्मा बसवेश्वरांचा आकर्षक असा पूर्णाकृती पुतळा होता तर
या शोभयात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या वेशभूषेत आश्वारूढ असलेल्या सर्वेश सचिन राजुरे यांने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी महिलांनी बसवनामाचा गजर करत पाऊली खेळत तसेच फुगडी खेळत या शोभा यात्रेची शोभा वाढवली. या शोभा यात्रेत युवकांना देखील फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. मेन रोड तहसील रोड मार्गे शोभा यात्रा शास्त्री चौकात आल्यावर शिवतीर्थ शोरूम च्या वतीने सर्व समाज बांधवाना सरबत देण्यात आले. त्यानंतर लाल बहादूर शात्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माळी गल्ली, मोमीनपुरा, मार्गे रेणुका देवी च्या मंदिरात महाप्रसादाने समारोप करण्यात आला. या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी महिलांनी पण रक्तदान केले. निबंध स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा शारदा स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक व युवा नेते रणवीर काका पंडित यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी युवा नेते शाम रुकर, सुधाकर संभाहारे, वैजिनाथअप्पा मिटकर, कल्याण स्वामी, विनायक स्वामी, गणेशअप्पा कापसे, योगेश रुकर, वैजिनाथ रुकर, सुरेश संभाहारे, रवींद्र रुकर, योगेश कापसे, प्रकाश दावणगिरे सुरेंद्र रुकर, दिपक कापसे, गणेश मिटकर,सुनील संभाहारे, प्रवीण राजुरे, नंदकिशोर कापसे, उमेश राजूरकर, गणेश रुकर, संतोष सोसे, राजेंद्र फुलशंकर, दिपक कापसे, अक्षय शेटे, शंकर संभाहारे, सचिन राजुरे, ज्ञानेश्वर फुलशंकर, महेश सोसे,बद्रीनाथ कापसे आदींची उपस्थिती होती. तर हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवराज मिटकरी ,अनिकेत वाडकर, अजय रुकर,
बबन शंखपाळ, गजानन कापसे,अनिकेत संभाहारे, अमोल फुलशंकर, अमोल संभाहरे, विशाल कापसे, रोहित फुलशंकर,अमोल फुलशंकर, संदीप रुकर, गजानन संभाहारे, दत्ता टोणपे, दिनेश संभाहारे, रोहन सोसे, लहान थोर, पुरुष – महिलांनी परिश्रम घेतले.


