pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

“सस्ती अदालत” या उपक्रमाचा गरजू शेतक-यांना मिळाला लाभ

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.9 

 विभागीय आयुक्त यांचेकडील परिपत्रकानुसार, छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्हयात तहसिलस्तरावर तसेच मंडळ मुख्यालच्या ठिकाणी गरजू सामान्य शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते / पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी व त्यांना जलद न्याय मिळवून देण्याकरीता अनेक प्रकरणे समुपदेशाने मिटवण्याचा प्रयत्न सस्ती अदालत” मध्ये करण्यात आलेला आहे. प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने आज दि.9 मे 2025 रोजी या जिल्हयात आयोजित केलेल्या “सस्ती अदालत” मध्ये प्राप्त व निकाली प्रकरणाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 चे कलम 5 अन्वये किंवा म.ज.म.अ. 1966 चे कलम 143 अन्वये एकूण 88 प्रकरणे प्राप्त झाली असुन, त्या पैकी 28 प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. उर्वरीत प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करणे सुरु आहे.

सामान्य शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते / पाणंद रस्ते मोकळे करणेकामी जलद न्याय मिळावा व प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या शुक्रवारी तालुकास्तरावर सस्ती अदालत आयोजित करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त गरजू शेतक-यांनी सदर उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे