pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

रायगड जिल्ह्यात तसेच नवी मुंबईत ड्रोन कॅमेऱ्यांना बंदी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात तसेच संपूर्ण नवी मुंबईत ड्रोन बंदी आदेश देण्यात आले आहेत. सागरी किनाऱ्यावर हे आदेश कायम असतात. मात्र पहलगाम येथील हल्ल्यानंतरची परिस्थिती पाहता सुरक्षा म्हणून ही बंदी संपूर्ण रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात घालण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकोर पणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पहलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ला आणि त्याला भारताने सडेतोड उत्तर दिल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान शस्त्रविराम आहे. मात्र सुरक्षाविषयक सतर्कता बाळगली जात आहे. आजच्या सॅटेलाईट तंत्रज्ञान काळात असे हल्ले करण्यास ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे ठाणेपाठोपाठ रायगड जिल्ह्यात तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन कॅमेराला बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ११० किलोमीटर सागरी किनारा आहे. यात ऐरोली ते वाशी करावे एनआरआय, खारघर उरण ते घारापुरी लेणी हा परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. या क्षेत्रात ड्रोन कॅमेरा बंदी कायम असते. मात्र पहलगाम हलल्यानंतर पूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन कॅमेराला बंदी घालण्यात आली आहे.

परिच्छेद क्र. १४४ : संदर्भ :- ऑर्डर क्र. POA/NMU/V.Sha/MA/१९५८/२०२५, दिनांक १५/०५/२०२५ भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार जारी केलेला आदेश नुसार नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन वर बंदी घालण्यात आली आहे.नवी मुंबई हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र (Unmanned Aerial Vehicles-UAV) यांचा वापर काही असामाजिक तत्वांकडुन करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे.या कारणास्तव अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत.म्हणुन रश्मी नांदेडकर – पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये ड्रोन संबंधि आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या ह‌द्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालवण्यास, उडवण्यास, किंवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.हा आदेश दिनांक १५/५/२०२५ रोजीचे ००.०१ वा. पासुन ते दिनांक ०३/०६/२०२५ रोजीचे २४.०० वाजे पर्यत लागु राहील.कोणतीही व्यक्ती या आदेशाचे उल्लंघन करील, तर तिच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच इतर लागु असलेल्या कायदयान्वये कारवाई करण्यात येईल.हा आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी (ex parte) पध्दतीने लागू करण्यात येत आहे.अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तर्फे देण्यात आली आहे.

———————————————————-
काही अघटित घडू नये म्हणून ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. खासगी समारंभ वा हौस कॅमेराचा वापर केला जातो, मात्र त्यामुळे भीती आणि पाठोपाठ अफ़वा पसरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे ही बंदी घालण्यात येते. कोणी या आदेशाचे उलंघन केले तर कायाद्यानुसार गुन्हा नोंद करून कारवाई होईल.
– इंद्रजित करले,सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे