pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उरण तालुका अपघात निवारण समितीने विविध समस्यावर उठविला आवाज.

विविध मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

उरण तालुक्यातील रस्ते अपघात, वाहतूक कोंडी,सर्विस रोड-महामार्गावरील अनधिकृत पार्किंग, पायाभूत सूविधा इ. बाबत उरण तालुका अपघात निवारण समिती तर्फे जेएनपीए काॅन्फरन्स हाॅल येथे बैठकिचे आयोजन केले होते. उरण मधील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन उरण तालुका अपघात निवारण समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून अपघात, वाहतूक कोंडी, प्रवाशांच्या समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या वर वेळोवेळी आवाज उठविला जात आहे.त्याला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शासनही सकारात्मक पाऊले उचलत आहे.

उरण मध्ये आयोजित केलेल्या सदर बैठकिस जेएनपीएचे दोन्ही विश्वस्त – दिनेश पाटील आणि रवि पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, गोपाल पाटील, जेएनपीएचे मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) डाॅ थाॅमस, प्रशासकीय अधिकारी एस.के.कुलकर्णी आणि डीपी वर्ल्ड, जीटीआय, पीएसए (सिंगापूर), एनएसएफटी(जेएम बक्षी) या पोर्टचे अधिकारी, तिन्ही वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. जेएनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी सुरूवातीलाच जेएनपीए आणि इतर बंदर प्रशासनाकडून विविध स्तरावर होत असलेला निष्काळजीपणा आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याबद्दल खंत व्यक्त केली व यापुढे बैठकित घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकित प्रामुख्याने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
१).ट्रेलर कंटेनर रस्त्यात बंद पडले किंवा अपघात झाल्यास सदर वाहने उचलण्यासाठी जेएनपीएने दोन हैड्रा/टोइंग वाहने तातडीने उपलब्ध करावीत.
२).चारही बंदरातील ट्रफिक विभागाने बाहेर पडणाऱ्या आपापल्या ट्रेलर- कंटेनरवर नियंत्रण ठेवावे, त्यासाठी फिरत्या वाहनांचा वापर करावा.
३).उरण तालुक्यातील रस्त्यांवर सीसी टिव्ही कॅमेरे बसवून वाहतूक/अपघात नियंत्रणासाठी कंट्रोल रूम सिस्टम तयार करावी.
४).ट्रेलर-कंटेनर आणि जड वाहनांनी फक्त डाव्या बाजूच्या दोन लेनचा वापर करावा व वाहन महामार्गावर पार्किंग करू नये अशा वाहन चालकांना सूचना देण्याची व्यवस्था करावी.
५).जेएनपीए तर्फे दोन अँब्यूलन्स तातडीने देण्यात याव्यात.
वरील बाबत जेएनपीएचे दोन्ही विश्वस्त वेळोवेळी पाठपुरावा करणार आहेत. तसेच पुढील विभागीय बैठक उरण आणि कोप्रोली येथे लवकरच घेण्यात येणार आहे अशी माहिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे