pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उरण रेल्वेस्थानकावरील लिफ्टचे काम अपूर्ण

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

उरण येथे नुकत्याच सुरू झालेल्या उरण-नेरुळ हार्बर रेल्वेला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. उरण येथील हार्बर रेल्वे स्टेशन करीता दोन लिफ्टचे काम अपूर्ण आहे. स्टेशन चे तिकीट बुकींगचे कार्यालयाचे पूर्वेकडील टॉयलेट सुरु असून पश्चिमे कडील टॉयलेट बंद आहे. उरण स्टेशनवर लहान मुलांकरीता फिडिंग रुम अस्तित्वात नाही. तसेच स्टेशनची सफाई ४ ते ५ सफाई कामगारांमार्फत दुपारी संध्याकाली केले जाते. त्यामुळे प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागतो. स्टेशन मध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असून सुरक्षा रक्षक यावर लक्ष देत नाहीत. रेल्वे स्टेशनवर कँटिंगची सुवीधा नसून रिक्षा व्यवस्था ही अपूरी असून गर्दीचे वेळी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळतात. खरे पहाता, रेल्वेच्या नियमाप्रमाणे रेल्वे प्रत्येक स्थानकामध्ये ५ ते ६ सेकंद थांबण्याचा नियम असताना उरण रेल्वे स्थानका दरम्यान ३ ते ४ मिनिटे घेते. त्यामुळे प्रत्येक रेल्वे १० ते १५ मिनिटे उशीराने धावते.
वरील प्रकाराने उरण येथील रेल्वे प्रवासी त्रस्त अजून सदरच्या मागणीसाठी प्रवाशी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जाते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे