pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नवी मुंबई व उरणमध्ये प्रथमच ‘वारसादर्शन व छायाचित्रण फेरी’ — इतिहासाच्या पाऊलखुणांवर रमणीय सफर!

प्रथमच उरण मध्ये कार्यक्रमाचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

नवी मुंबईच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडत, प्रथमच “हेरिटेज व फोटोवॉक” चे आयोजन २५ मे रोजी सकाळी ९ वाजता उरण येथे करण्यात आले. हेरिटेज वॉक ही अभिनव संकल्पना उरणमधील निसर्ग पर्यटन तसेच ऐतिहासिक पर्यटन वाढीस लागावे म्हणून निकेतन रमेश ठाकूर यांनी, फेसबुकवरील “आठवणीतले उरण” या ग्रुपच्या माध्यमातून मांडली होती त्यास अनेक लोकांची पसंती आली होती पण ठराविक लोकांनीच या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीसाठी उपस्थिती दाखविली होती. निकेतन रमेश ठाकूर (बोकडविरा )आणि वेदांत श्रीकांत पाठक(बोरी) या दोन नवतरुणानी ही संकल्पना ‘श्री गोपाळकृष्ण वाचनालय, देऊळवाडी’ यांच्या मार्फत प्रत्यक्षात उतरवली असून, यामार्फत उपस्थित सहभागीना उरणच्या समृद्ध सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसाची ओळख करून दिली गेली. या वारसा दर्शन व छायाचित्रण फेरीसाठी मुंबई, पुणे,खारघर, उलवे नवी मुंबई येथील तसेच उरणमधील काही रहिवासी तसेच इतिहास अभ्यासक, उत्सुक तसेच उरण बद्दल आस्था असणारे ३० लोक उपस्थित होते.”आठवणीतले उरण” ही वारसा दर्शन व छायाचित्रण फेरी पूर्णपणे मोफत होती व प्रायोगिक तत्वावर सहभागींना देऊळवाडीमधील सर्व ऐतिहासिक मंदिरे त्यांचा इतिहास, मंदिर स्थापत्यशैली तसेच त्या मंदिरांतील धार्मिक महत्व,सणसमारंभ यांची माहिती सांगितली ,श्री गोपाळकृष्ण वाचनालय जे ८१ वर्ष जुने आहे त्यात असणारी ३५ हजारांपेक्षा जास्त असणारी अनेक दुर्मिळ पुस्तके,जुनी पण उत्तम कौलारू बांधकाम शैली असलेलल्या श्री गोपाळकृष्ण वाचनालयाच्या सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच ग्रंथपाल व ग्रंथालय कर्मचारीवृंद यांनी अशा नवोपक्रम कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.विमला तलाव, एन. आय हायस्कूल, भिवंडीवाला बाग व प्राणिसंग्रहालय, ब्रिटिशकालीन भिवंडीवाला वॉटर वर्क्स व राजमहाल सिनेमागृह यांची माहिती सांगण्यात आली. श्री गोपाळकृष्ण वाचनालयात ग्रंथालयातर्फे अनेक दुर्मीळ पुस्तकांचे व निकेतन ठाकूर यांनी पोस्ट कार्ड तसेच पोस्ट स्टॅम्प व उरणच्या आठवणींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते.सर्व उपस्थिताना या कार्यक्रमाची संस्मरणीय आठवण म्हणून खास या कार्यक्रमासाठी तयार केलेले पोस्टकार्ड व बुकमार्क मोफत वितरीत केले.
या वॉकद्वारे सहभागींच्या कॅमेर्‍यात केवळ फोटो नव्हे, तर उरणच्या इतिहासाच्या असंख्य आठवणीही बंदिस्त झाल्या आहेत.
“Not just a walk – an experience you’ll remember.” हे ब्रीदवाक्य असलेली ही ‘सफर’ केवळ उरणच्या वाटांवरची नाही, तर इतिहासाच्या खुणा शोधण्याची एक अविस्मरणीय संधी होती असे या वॉक साठी उपस्थितीत असलेल्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे