pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय – आदर्श शेतकरी प्रकाश ठाकूर

अरुंद शेत रस्ते होणार १२ फुटांचे, उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले निर्णयाचे स्वागत.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30

महाराष्ट्राचा आधुनिक शेती व
वाढत्या यांत्रिकीकारणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागाने अतिशय क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
बांधावरून जाणारे सध्याचे पारंपरिक अरुंद शेतरस्ते आधुनिक कृषी अवजारांची ये – जा सुलभ व्हावी, तसेच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहचावा यासाठी ३ ते ४ मीटर, म्हणजे जवळपास १२ फूटाचे रस्ते करण्यात येणार आहेत. पारंपरिक शेत रस्ता बांधणीच्या १९६६ च्या निर्णयानंतर प्रथमच म्हणजे, सुमारे ६० वर्षांनी महाराष्ट्राच्या आधुनिक शेतीसाठी हा निर्णय झाला आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महायुती सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे शेतकरी बांधवांच्या जीवनात आर्थिक उन्नती होणार असल्याचे मत उरण तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र शासन आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रकाश ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील मालवाहतूक करण्यासाठी रस्त्या अभावी अडचणी येत होत्या. ही अडचण महायुती सरकारने सोडवली असून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्यासाठी अरुंद रस्ते मोठे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.हा निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असल्याचे प्रकाश ठाकूर यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयामुळे शेतकरी हिताची पायाभरणी होत असून, सर्वंकष सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय अस्तित्वात आला आहे.
विशेष म्हणजे, शेतरस्त्यांच्या जागांमध्ये अतिक्रमणासह भविष्यातील खरेदी विक्रीच्यावेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नयेत म्हणून या शेतरस्त्यांची नोंद आता जमिनीच्या ७/१२ मध्ये होणार आहे. हे शेतरस्ते जलदगतीने पूर्ण करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
यामुळे आता शेतकरी बांधवांना आधुनिक शेती व उत्पन्नवाढीसाठी या निर्णयाचा नक्की फायदा होईल अशी अपेक्षा उरण मधील प्रगतशील व आदर्श शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे