pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

घारापुरी ग्रामस्थांना कायमस्वरूपी कटलरी दुकाने मिळावीत म्हणून ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना दिले निवेदन.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2

दिनांक ०२/०६/२०२५ रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उरण येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत घारापुरी यांचे वतीने विविध समस्या सोडविण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
१) घारापुरी हे बेट असल्याने येथील ग्रामस्थ कटलरी दुकाने लाऊन उपजीविका चालवतात. मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या कडून वारंवार दुकाने हटवण्यासाठी नोटिसा देतात. त्यामुळे ग्रामस्थांना कायमस्वरूपी दुकाने मिळाल्यास सदरचा प्रश्न निकाली निघेल.
२) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्फत घारापुरी घारापुरी बेटाचा विकास आराखडा तयार केला असून त्याप्रमाणे विकास कामे सुरू आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सदरच्या कामांना मंजुरी देत नसल्याने कामे होत नाहीत.
३) घारापुरी येथे विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास गावाचा विकास होईल.
अशा मागण्यांचे निवेदन घारापुरी ग्रामपंचायतच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आले.यावेळी तहसीलदार उद्धव कदम , गट विकास अधिकारी समीर वाठारकर , सर्व विभागाचे अधिकारी, घारापुरी ग्रामपंचायतचे सरपंच मीना भोईर,उपसरपंच बळीराम ठाकूर,सदस्या अरुणा घरत, हेमाली म्हात्रे,नीता ठाकूर, भारती पांचाळ आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.घारापुरीसाठी शासनाकडून विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे आणि यापुढेही देणार.तसेच येथील कटलरी दुकानदारांची दुकाने हटविणार नाही अशी हमी खासदार श्रीरंग बारणे यांनी घारापुरी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे