pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

ग्रामपंचायत भेंडखळ तर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19

उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत ही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात व शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचविण्यासाठी नेहमी अग्रेसर असते. जेष्ठ नागरिकांचा ग्रामपंचायतने सत्कार करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय भेंडखळ येथे आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रम राबविताना गावातील जेष्ठ नागरिक महिला व पुरुष ३५० ते ३६० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांना ग्रामपंचायत तर्फे रजई, पिलो कव्हर,बेड शिट,छत्री वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला.सदर सत्कार सरपंच मंजिता मिलिंद पाटील,उपसरपंच स्वाती संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिपक दामोदर ठाकूर, अजित वासुदेव ठाकूर ,अभिजीत देवानंद ठाकूर, लिलेश्वर गजानन भगत, ग्रामपंचायत सदस्या सोनाली कौस्तुभ ठाकूर, शितल जीवन ठाकूर, स्वाती महेंद्र घरत ,संगीता मेघश्याम भगत ,अक्षता अनिल ठाकूर, प्राची अक्षय ठाकूर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला. ग्राम विकास अधिकारी किरण वसंत केणी यांनी प्रस्तावना करून गावातील ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केले. यापुढेही असे कार्यक्रम केले जातील असे सरपंच मंजिता मिलिंद पाटील यांनी सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यालयीन कर्मचारी यांनी पण मोलाचे सहकार्य केले.एकंदरीत विविध उपक्रम राबवून शासनाच्या सर्वच योजना तळागाळात पोहचविणाऱ्या भेंडखळ ग्रामपंचायतने जेष्ठ नागरिकांचा सत्कार करून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे