pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

डॉ. राजकुमार कांबळे तसेच राजेंद्र कांबळे यांचा सत्कार संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19

नॉलेज ट्रेड फाउंडेशन पुणे आयोजित फलटण नजीक साईरत्न हॉल फरांदवाडी येथे संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा,दिलीप सिंह भोसले नगराध्यक्ष नगरपरिषद यांच्या शुभहस्ते डॉ.राजकुमार ज्ञानदेव कांबळे उच्च विद्या वाचस्पती डॉक्टररेट पदवी प्राप्त व राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार राज्यपाल हस्ते प्राप्त झाल्याने दोन बंधूंचा भव्य सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला त्यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते त्यावेळी डॉ. राजकुमार कांबळे यांचा गौरव करतो फलटण तालुक्यात डॉक्टरेट एक पदवी आली तेही जागतिक स्तरावरून फलटण तालुक्याचे मान निश्चितच उंच झाली याचा संपूर्ण तालुक्याला अभिमान आहे ही पदवी मिळवणे फार अवघड आहे याच्या पाठीमागे खूप कष्ट आहेत आणि ते कष्ट कांबळे या कुटुंबाने घेतले याचेही फळ त्यांना मिळाले आहे त्यांचे दुसरे लहान बंधू राजेंद्र कांबळे यांनाही विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सन्मानित करण्यात आले आहे म्हणजे त्यांचीही कार्याचे मोजमाप महाराष्ट्र सरकारने केले आहे अशा अष्टपैलू असणाराच हा पुरस्कार मिळवतो यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली हे दोन्हीही बंधू छोट्या खेडेगावी जन्माला येऊन त्यांची कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली याच बरोबर अमेरिकेतील विद्यापीठांनी घेतली आहे याचा आम्हा फलटण वासीयांना अभिमान आहे डॉ. कांबळे यांना शेळीपालन या विषयात मिळाली आहे त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होईल.आता ते प्रशिक्षण देत आहेतच पण अल्पवधीतच त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना एक व्यवसाय मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल शेळीपालन व्यवसायात वाढ होईल याची सुरुवात झाली आहे बेरोजगारांना रोजगार मिळेल व्यवसायिकांचे उत्पन्न वाढेल व्यावसायिक वाढतील अनेकांचा व्यवसाय होईल याचा मला विश्वास आहे त्यानंतर नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना या दोन्ही बंधूंचा सत्कार करतो त्यावेळी ते म्हणाले की डॉक्टर कांबळे यांच्या मार्गदर्शनाने अनेक व्यवसायिक घडत त्यांनी तेच काम सुरू केले आहे मलाही त्याचा अभिमान आहे त्यामुळे बंधू हे सामाजिक विचाराने प्रेरणे झालेले आहेत यांचा प्रवास खूप अडचणीचा आहे प्रतिकूल परिस्थितीत हे यश दोघांनीही खेचून आणले आहे असे मला वाटते खरेच हे कौतुकास्पात्र आहेत भिलकटी, वडजल, निंभोरे, या परिसरात माझाही संपर्क असतोच वडजल या ठिकाणी लवकरच इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारत इमारतीचे पूजन होईल त्यामुळे या परिसराचा विकास होणार आहे शेवटी पुढील वाटचालीस कार्यास डॉ.कांबळे व राजेंद्र कांबळे यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी डॉ.कांबळे यांच्या कार्याचा महेंद्र साळवे यांनी सर्वांच्या मनात बसेल असे गीत सादर केले नॉलेज ट्रेड फाउंडेशन पुणे अध्यक्ष आशिष कांबळे उपाध्यक्ष कु. कांचन दूधमाळ यांनी या नॉलेज ट्रेड फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य द्यायचे व्यवसायाचे ट्रेनिंग देणे गोरगरीब वाडीवस्तीत पुस्तके वाटप करणे पंढरपूर वारीसाठी यात्रेकरू जेवण वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रमात राबवत सामाजिक कार्यकर्ता घडविणे गुणवंताचा पुरस्कार देऊन सत्कार करणे असे बरेच कार्यक्रम या संस्थेने राबवलेले आहेत त्यावेळेस साहेब गोट फार्म च्या अध्यक्ष सयोगिनी कांबळे उपाध्यक्ष नंदकुमार कांबळे यांनी प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. योग गुरु दीपकजी शिळमकर फडतरवाडी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सुभाष फडतरे नंदू कोलवडकर श्रीकांत डिसले तात्यासाहेब कदम, कुमार पोतेकर गजेंद्र नेवसे मनोज पाटील राजेंद्र इथापे संजय हुबरे काशिनाथ ठोंबरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.डॉ. प्रा. हनुमंत जगताप यांनी प्रस्तावना केली तर सूत्रसंचालन डॉ.प्रा. हिमगिरी यांनी मधुर वाणीने केले. साहेब गोट फार्म च्या अध्यक्ष संयोगिनी कांबळे यांनी सर्वांचे आभार मानून स्नेहभोजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे