pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर सामुहीक योग शिबिराचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.20

पंतप्रधान महोदयांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दि.21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. दि. 21 जुन 2025 रोजी जागतिक योग दिन दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यात दि. 21 जुन 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे सामुहिक योग शिबीर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन, जिल्हास्तर योग समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, जिल्हा योग संघटना, आयुष विभाग जालना, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, विविध योग संघटना, जिल्हा स्काऊट गाईड, तंत्र निकेतन महाविद्यालय व जिल्हा एकविध क्रीडा संघटना, विविध क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जुन 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे सामुहिक योगा व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर योग प्रात्यक्षिकासाठी येताना पांढरा सुटसुटीत ड्रेस असावा, सोबत मॅट/सतरंजी, पाणी बॉटल व नॅपकीन असावा. दि. 21 जुन 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे सामुहिक योगा व प्रात्यक्षिकासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त अधिकारी कर्मचारी, खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा प्रेमी, युवक युवती यांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक सिध्दार्थ कदम (मो.नं.8975333594), आशिष जोगदंड (मो.नं.8888346828), श्रीमती लता लोंढे (मो.नं.9850333326) श्रीमती आरती चिल्लारे, ( मो.नं.7758863991) यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे