पेरण्या खोळंबल्या शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
मोर्शी/प्रतिनिधि,दि.22
मोर्शी : पेरणीसाठी अर्धा जिल्हा जोमात असून अर्धा कोमात असल्याची अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्याच्या अर्ध्या भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.यंदा पुन्हा एकदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अर्ध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे, तर अर्ध्या भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. यंदा अनेक वर्षांनंतर जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे जून महिन्यातील मृग नक्षत्रामध्ये पाऊस होत नव्हता. त्यामुळे कायम पेरणी लांबणीवर पडत असे. त्यामुळे मूग, उडीद अशा पिकांना फारसा वाव मिळत नव्हता. यंदा मात्र मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्याने पेरणी अनेकांनी पिकांसाठी पुढील काळात पोषक वातावरण राहू शकते. जेव्हा पेरणी मृगामध्ये होते. तेव्हा ते वातावरण खरीप पिकांसाठी पोषक ठरते.जिल्ह्यातील चांदुर बाजार, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी तालुक्यात यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे या चारही तालुक्यात पेरणीची प्रक्रिया जोमात सुरू आहे. मोर्शी तालुक्यात समानधारक मिलिमीटर 31 पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर वरूड तालुक्यात 34 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाच्या जोरदार हजेरीने जोमात असल्याचे चित्र आहे. मोर्शी तालुक्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला असला तरी काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. चार तालुक्यांत पेरणीची प्रतीक्षा जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी, चांदुर बाजार आणि धामणगाव रेल्वे या चार तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केलेली आहे सर्वात कमी पाऊस मोर्शी तालुक्यात केवळ 31 मिलिमीटर झाला आहे. तालुक्यात पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर मोर्शी तालुक्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला असला तरी बहुतांश भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या चारही तालुक्यात पेरणी झालेली नसून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


