pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कृषिदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अमरावतीत केला सत्कार

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.3

मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील १४ महिला शेतकऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कर्तबगार महिला असे शिक्कामोर्तब केले आहे. सीईओ संजीता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार, १ जुलै कृषिदिनी या महिलांचा सत्कार करण्यात आला.जि. प.च्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा सत्कार सोहळा घेण्यात आला. या वेळी डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, डेप्युटी सीईओ बाळासाहेब बायस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. राहुल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर, चांदूर बाजार तालुक्यातील रजनी रावणकर, चिखलदऱ्यातील शांता साठे, चांदूर रेल्वेतील सविता डोंगरे, अंजनगाव सुर्जी तील रेखा पिसाट, धामणगाव रेल्वेतील मोनिका दगडकर, अमरावती तालुक्यातील शीतल शिंदे, तिवस्यातील जयश्री खवले, अचलपूर तालुक्यातील मंदा मेहरे, भातकुलीतील रेखा शेंद्रे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माधुरी काकडे, दर्यापुरातील जयश्री टोळे, धारणीतील रामगोपाल मावस्कर, मोर्शी तालुक्यातील लता पोहेकर आणि वरुड तालुक्यातील माया यावलकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कृषी विभागाचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे