pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्प लाईन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.8

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जेष्ठ नागरिकांसाठी 14567 राष्ट्रीय हेल्प लाईन ही सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते.“मानवसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा (MD) यांच्या मार्गदर्शनाखाली 37 वर्षापासून सातत्याने आपल्या विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृध्य, अपंग, निराधार, गरीब मुले मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत.

ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून, 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे. हेल्पलाइनद्वारे  आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, याबाबतची माहिती मिळते. तसेच कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 आदीचे मार्गदर्शन मिळते. भावनिक आधार, मानसिकआजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन.

बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद,पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन देखील केले जाते.

‘एल्डर लाईन 14567’ ही केवळ हेल्पलाईन नाही, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात. तसेच त्यांना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक ती मदत केली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे