[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.15
वाईट गोष्टी व कृत्ये तसेच हिरोगिरी करून
स्वतःमध्ये नायक शोधणारे अनेक तरुण खर्या अर्थाने स्वतःला फसवत असतात.तर समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी प्रसंगी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
राहणारे त्यांना वेगवेगळ्या प्रसंगात मदत करणारे तरुणच खर्या अर्थाने समाजाचे नायक असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शहरातील
शाकुंतल नगर भागातील मीनाक्षी हॉस्पिटल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख आशिष बोकन यांनी डॉक्टर्स डे निमित्त आयोजित
केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवनाथ जाधव, शहरप्रमुख बाला परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर डॉ.नामदेव वाघ, डॉ.सुलोचना वाघ, डॉ.कैलास
सचदेव, डॉ.सतीश शेकडे, डॉ.योगेश नेमाने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.पुढे बोलतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले कि, इतरांचे
सुख-दुःख आपले सुख-दुःख मानून त्यांच्यासाठी झटणारा इतरांसाठी आजारपणत,दुर्घटनेत, अडी-अडचणी प्रसंगी व आनंदाच्या क्षणीही रहिवाशासोबत उभा
राहणारा तरुण महत्वाचा आहे. कोणते तरी निमित्त शोधून लोकोपयोगी उपक्रम राबवून समाजाची सेवा करणारा तरुणच खर्या अर्थाने समाजाचा नायक असल्याचे
जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी सांगितले व शिबिराच्या आयोजानाबद्दल आशिष बोकन यांचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी मोठ्या प्रमाणावर
रक्तदान केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक आशिष बोकन यांच्यासह अक्षय बोकन,ज्ञानेश्वर केंद्रे, सागर बोकन, योगेश काळे आदींनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]