उरण नगरपरिषदेच्या माॅं साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयाच्या अभ्यासिकेतून तयार होत आहेत अधिकारी वर्ग.
अभ्यासिकेसाठी अधिक वेळ देण्याची गरज
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
उरण नगरपरिषदेचे माॅं साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मा.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी “अभ्यासिका” ग्रंथापाल संतोष पवार आणि सहाय्यक कर्मचारी जयेश वत्सराज यांच्या देखरेखीखाली सुरु करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आवश्यकते प्रमाणे निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता मिळाला पाहिजे असे मत ग्रंथपाल संतोष पवार यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे अभ्यास करण्यासाठीची धडपड, उत्साह पाहून ग्रंथपाल संतोष पवार यांनी यावेळी समाधान व्यक्त केले आहे.
माॅं साहेब मीनाताई ठाकरे वाचनालया मधील अभ्यासिकेचे एक विद्यार्थी जे माजी सैनिक आहेत ज्यांचे नाव जयेश पाटील आहे.विवाहीत असून दोन मुले आहेत ते त्यांची नोकरी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून नियमित अभ्यासिकेमध्ये अभ्यास करण्यासाठी येत असत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे मेहनतीचे चीज झाले. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून त्यांचे एकाच वेळी तीन ठिकाणी सिलेक्शन झाले जसे मुंबई महानगरपालीकेमध्ये कर निरीक्षक, मुंबई महापालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक, मंत्रालय क्लार्क या तीन पोस्ट वर एकाच वेळी निवड झाली. उरण नगरपरिषदेचे माॅं साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय ग्रंथपाल संतोष पवार आणि सहाय्यक कर्मचारी जयेश वत्सराज आणि उरण नगरपरिषदेच्या ग्रंथालयातील विद्यार्थ्यांनी मिळून माजी सैनिक जयेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार केला.त्या प्रसंगी माजी सैनिक जयेश पाटील यांनी ग्रंथपाल संतोष पवार, सहकारी जयेश वत्सराज आणि उरण नगरपरिषद प्रशासनाचे “आभार” मानले.आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शना बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लायब्ररी मधील उत्साहवर्धक वातावरणा मुळे आणि ईतर विद्यार्थी मित्रांचे सहकार्यामुळेच हे शक्य झाले अशी भावना व्यक्त करत असताना उरण मध्ये एक स्वतंत्र सुसज्ज अशी एकतरी अभ्यासिका निर्माण होण्याची आवश्यकता आहे जेणे करून आमच्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना नक्की या अभ्यासिकेचा फायदा या स्पर्धेच्या युगात होऊ शकेल असे मत व्यक्त करत जयेश पाटील यांनी अथक प्रयत्नांना दुसरा पर्याय नाही असे तरूणांना संदेश दिला.सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.


