जगाच्या सार्वत्रिक विकासात महीलांची भूमिका महत्त्वाची – प्राचार्य, डॉ. आर. टी. देशमुख.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20
जाफराबाद येथिल, सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जाफराबाद व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच महीला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे हारपाळ येथिल जि.प.प्रशाला जाफराबाद . जि. जालना. येथे आज दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. आर .टी .देशमुख यांनी महीला मेळाव्यात आपले विचार व्यक्त करतांना महीला धार्मिक, औद्योगिक, सांस्कृतिक व राजकीय इत्यादी क्षेत्रांत आपले मौलिक योगदान देत आहेत .या साठी मध्ययुगीन कालखंडापासून ते आजपर्यंत महीलांच्या योगदानाचा सोदाहरण आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती प्रा.डॉ. सुनंदा सोनुने यांनी महिलांना आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन, कुटुंबातील भूमिका व सामाजिक जबाबदाऱ्या याबाबत सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये नवं चैतन्य निर्माण झाले.
या कार्यक्रमास मौजे हारपाळ येथिल गावचे प्रथम नागरिक लोखंडे आर. यु.,उप सरपंच जाधव ज्ञानेश्वर, मुख्याध्यापिका श्रीमती शिवणीकर एस. एल., श्री पाटील पी.जी, फुकट जी. आर, श्रीमती लहाने एल. बी., श्रीमती वाकोडे डी. के., तसेच हारपाळा येथिल, श्रीमती ममता जाधव, श्रीमती सुनीता खडके, श्रीमती ईंदुबाई जाधव, श्रीमती पूजा जाधव व गावातील बहुसंख्य महीला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डाॅ. शिवाजी जगतवाड, डॉ. प्रद्रीप मिसाळ, श्रीमती सरीता मणियार, तसेच महीला विकास कक्षाच्या डॉ. सारीका जाधव, श्रीमती प्रा. निर्मला खांडेभराड व महाविद्यालयातील प्रसिद्ध प्रमुख प्रा. अनिल वैद्य यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


