संजय येलवंते यांची शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. व शालेय भारतीय खेळ महासंघ अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, द्वारा 69 वी शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा (१७ वर्षे मुली) 2025 26 चे आयोजन दिनांक 24 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा व संकुल, कोकमठाण येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे
या स्पर्धेसाठी जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किनगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे कार्यरत असलेले राष्ट्रीय कबड्डी पंच व प्रशिक्षक संजय येळवंते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांनी यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, व अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेमध्ये पंच म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे या नियुक्ती बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाबासाहेब इंगळे प्राचार्य कैलास मुके जालना जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षा माधवी काळे प्राध्यापक सोपानराव तेलगड सचिव प्रशांत तेलगड महेश खर्डेकर भुजंग डावकर डॉक्टर प्रशांत राष्ट्रीय कबड्डी सुवर्णपदक विजेता खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक रवींद्र ढगे बाबासाहेब मंडळे सुंदर थोरात संतोष नागवे प्राचार्य निलेश गायकवाड बी जे पाटोळे दिनेश वाघ विठ्ठल दिवटे शिवम जाधव माधव चव्हाण अजय काळवणे हरी वाडेकर प्रदीप राठोड देविदास भोजने राष्ट्रीय खेळाडू रोहित बिन्नी वाले आकाश दिवटे यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


