pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

निंभार्णी परिसरात बिबट्याची दहशत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

ता मोर्शी/ प्रतिनिधि,दि.19

जंगल लागून असलेल्या निंभार्णी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या वावराने आणि हल्ल्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. विशेषतः, निंभार्णी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत दोन गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यापैकी एका गुराचा बिबट्याने फडशा फाडला आहे, हे गुरे अनिलराव ढेवले यांच्या घरातल्या गोठ्यात बांधून असताना बिबट्याने हल्ला केला.निंभार्णी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेवी माहिती मिळताच त्रिफुल ढेवले यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाच्या विद्या बनसोड व पोलीस पाटील निंभार्णी यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मेलेल्या गुरांचे दफन करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून निंभार्णी या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. येथे अनेकदा गुरे, शेळ्या आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहे.दोन गुरांना मारल्यामुळे निंभार्णी येथील शिकार होण्याचे प्रमाण खूप लक्षणीय आहे. सद्या तरी शेतात कापूस वेचणी जोमात सुरू आहे. काम करणाऱ्या. महिलामजूर वर्गांना अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्यांच्यातही मोठी भीती आहे. गेल्या वर्षांपूर्वी गावातील शेळ्या मेंढर याच प्रकारे बिबट्याने हल्ला केलेला होता अलिकडे जंगल भाग लागून असलेल्या निंभार्णी येथील परिसरातही बिबट्याचा मुक्त्त संचार वाढला आहे. ग्रामस्थांव्या घराच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहे बिबट्याचा तात्काळ बंदबोस्त करावा आणि मागणी निंभार्णी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे