आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
.२५ जुलै ते २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपण आपल्या घरोघरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सोहळ्यात सहभागी व्हा संस्थाचे सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेरचे आव्हान
नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.23
नांदेड;– आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्राच्या वतीने गेल्या सात वर्षापासून संपूर्ण नांदेडसह महाराष्ट्रभर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा आगळावेगळा उपक्रम हभप राम महाराज पांगरेकर व त्यांच्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे.या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे साधकांनी हे पारायण आपल्याच घरी बसून आपल्या सोयीच्या वेळेनुसार करावयाचे आहे. पारायणामध्ये लहान, थोर,वृद्ध, स्त्री, पुरुष ,बालक सुद्धा सहभागी होऊ शकतात. पारायण सर्वांनीच करावे असा संस्थेच्या आग्रह आहे. आम्ही वारकरी परिवाराने “घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी” हे ब्रीद उराशी बाळगून हा उपक्रम सुरू केला. पारायनासाठी लागणारी ज्ञानेश्वरी पारायण प्रत साधकांच्या घरोघरी मोफत स्वरूपात पोहोचविण्याचे काम आजपर्यंत आम्ही वारकरी परिवाराने केलेले आहे. सन २०१८ मध्ये अवघ्या ४२ साधकांना घेऊन सुरू केलेला प्रवास गतवर्षी ९०३३ एवढे साधक पारायणास बसवून संकल्पपूर्ती सोहळा म्हणजेच माऊलीच्या ज्ञानेश्वरी मध्ये “जेवढ्या ओव्या तेवढे साधक” पारायण करण्यास बसवले. संकल्पपूर्ती सोहळा झाल्यानंतर सुद्धा आम्ही वारकरी परिवाराकडून याही वर्षी तो सोहळा सातत्याने साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी सुद्धा साधारणता: १००० ज्ञानेश्वरी पारायण प्रती, पारायण वेळापत्रकाचे पत्रक आम्ही वारकरी परिवाराकडून मोफत स्वरूपात वितरित केले आहेत. गेल्या ८ वर्षांमध्ये जवळजवळ ११००० साधकांना मोफत ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम आम्ही वारकरी परिवाराकडून करण्यात आलेला आहे. यावर्षीचे पारायण दिनांक २५ जुलै शुक्रवार रोजी प्रारंभ होत आहे. पारायनाची सांगता २९ ऑगस्ट २०२५ शुक्रवार रोजी वै. उद्धवराव पाटील यांचे मामा मंगल कार्यालय मारतळा ता. लोहा जि.नांदेड येथे सकाळी ८ ते १ या वेळेत सांगता सोहळा संपन्न होणार आहे.अशी माहिती आम्ही वारकरी परिवाराकडून देण्यात आलेली आहे.आम्ही वारकरी परिवाराच्या या उपक्रमाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. असे प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर प्रसिध्दी कोषाध्यक्ष रामभाऊ चन्नावार यांनी दिली


