pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

श्री.रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे, व ए. एस सी कॉलेज बी एस सी बॅच १९९२ च्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे, गोवठणे, पाले, पाणदिवे, सारडे वशेणी, पुनाडे, पुनाडे वाडी, कडापे या दहा गाव परिसरातल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ए. एस. सी कॉलेज बी. एस. सी बॅच १९९२ व श्री रामदास गवत्या गावंड सामाजिक संस्थेचे पदाधिकारी नितीन रामदास गावंड( आई फार्मा व आई मेडिकल मालक, पनवेल तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन अध्यक्ष ),ऍड.राजेश ठाकूर नेरे (थेरा रिसॉर्ट चे मालक ),रामलाल ठाकूर पुनाडे (दिपक फर्टीलीझर्स ), संजय म्हात्रे, बामन डोंगरी (बी पी सी एल, मुंबई ),सदाशिव पाटील पुनाडे (सलोनी ऑरगॅनिक केमिकॅल्स),
हसुराम म्हात्रे वशेणी (डी ए व्ही चे सिनियर अकाउंटंट ) या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षक वर्गांनी चांगलं मोलाचं सहकार्य केलं.तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीप रामदास गावंड, साईनाथ रामदास गावंड, सदाशिव पाटील, राजेश कोंडिलकर, गणेश गावंड, अनिल गावंड आदींनी विशेष मेहनत घेतली. यावेळी शाळेतील विद्यार्थी,मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे