pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महसूल सप्ताहनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज  महाराजस्व अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न  

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला परतुर शहरातील विविध विभागांचा आढावा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.6

  जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने स्व. पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृह परतूर येथे परतूर तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपस्थित राहून महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणारे महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव केला. तसेच शासनाच्या विविध विभागाच्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून आमदार बबनराव लोणीकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे, छाया पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

तहसील कार्यालय परतूरला भेट देवून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला तसेच संपुर्ण तहसील कार्यालयाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला कार्यालयीन परिसर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्याच्या सुचना दिल्या. तहसील कार्यालयात भेट देणारे नागरिक व अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अणि अभ्यागत कक्षात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच परतूर शहरातील विविध परिसरात प्लास्टिकचा कचरा दिसून आल्याने त्याची विल्हेवाट लावण्याबाबत लोकसहभागातून कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर परतूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देवून  विद्यार्थ्यांचे अध्ययन कौशल्य व गुणवत्ता सुधारण्याबाबत सुचना दिल्या आणि  शिक्षक व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. तसेच परतूर शहराजवळील समाज कल्याण विभागाच्या नूतन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहास भेट देऊन तेथील स्वच्छता, सुविधा व  व्यवस्थापनाची पाहणीही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जवाहर नवोदय विद्यालयास

प्रत्यक्ष भेट देवून विद्यार्थ्यांसमवेत भोजनाचा घेतला आस्वाद

        अंबा-परतूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयास प्रत्यक्ष भेट देवून विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी मुक्त संवाद साधला. तसेच तेथे मिळणाऱ्या भोजनाबाबत चौकशी करुन स्वत: विद्यार्थ्यांसमवेत भोजन करुन भोजनगृहात देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. तसेच नवोदय विद्यालयातील रुचकर आणि स्वादीष्ट जेवण असल्याने शालेय अध्यापन व शालेय प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.  जवाहर नवोदय विद्यालयातील वर्ग खोल्याची पाहणी करुन सर्व वर्ग स्मार्ट क्लास रुम असल्यामुळे त्यांनी प्रशंसाही केली.

           यावेळी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, प्राचार्य एस.जी. पवार, शिक्षक आर.जी मस्के, अमिताभ भुक्तर, आर.ए.तांदळे, नवीन जैन, पी.पी.धुसे, राकेशकुमार गुप्ता, ए.के. जोशी, नर्मदा कुमारी, रोशना रशीद, दीपिका बराईक, प्रदीपकुमार शर्मा, समीर मंत्री, व्ही.ए.आंधळे, योगेश पाटील, अधिक्षक जी.आर. सुर्यवंशी, योगेश पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे