pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज राहावे” – लोकनेते श्री. रावसाहेब पाटील दानवे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.8

आज भारतीय जनता पार्टी कार्यालयात माजी आ. कैलासजी गोरंट्याल यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या निमित्ताने नवप्रवेशित कार्यकर्त्यांसह समन्वयक बैठक व “हर घर तिरंगा” यात्रेच्या नियोजन बैठकीचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

भाजपा कार्यालयात माजी आ.कैलासजी गोरंट्याल यांचे प्रथम आगमन झाल्याने त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय अधिक भक्कम होईल, असा विश्वास दादांनी व्यक्त केला.

या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आ. कैलासजी गोरंट्याल, जालना महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, अक्षय भैया गोरंट्याल, भाजपा प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चा चे पदाधिकारी, भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, मोर्चाचे पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे