pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

स्वातंत्र दिनी अन्यायग्रस्त शिक्षकांचे मुजोर मुख्याध्यापक तथा सचिव यांच्या अन्यायाविरुद्ध आमरण उपोषण!

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.14

दि.14 ऑगस्ट कै.नानासाहेब पाटील विद्यालय नजीक पांगरी ता. बदनापूर जि.जालना येथील मुख्याध्यापक तथा संस्था सचिव प्रल्हाद वाघ यांच्याकडून होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात जालना जिल्हा परिषदेच्या समोर शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण आज सुरू झाले आहे.

त्याच्या प्रमुख मागण्या
1 शालेय प्रशासनाकडून होणाऱ्या आर्थिक व मानसिक छळ थांबवा.
2. आमच्याकडून जबरदस्तीने घेतलेली पैसे परत द्यावे.
3.मुख्याध्यापकाकडून होणारी दमदाटी व शिवीगाळ बंद करणे.
4. शासन नियमाप्रमाणे शाळेची वेळ करावी.
5. थकित वेतन देण्यात यावे.
6. शिक्षक हजेरीपटावर नियमित स्वाक्षरी घेण्यात यावी.
7 मुख्याध्यापकाची हुकूमशाही व कर्मचाऱ्यातील भेदभाव थांबवावा.
8. नियुक्ती आदेश व मान्यता आदेशाची प्रत द्यावी.
9. सेवा पुस्तिकेचे दुय्यम प्रत देण्यात यावी.
10. शालेय पोषण आहाराच्या गैर व्यवहाराची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी.
11. जबरदस्तीने स्वाक्षरी घेऊन घेतलेले कोरे धनादेश परत करण्यात यावे.
12. महावर पगार पत्रके देण्यात यावी.
13. आयकर संबंधित पत्रके द्यावीत.
उपोषण कर्ते कर्मचारी:-
1. श्री प्रभाकर गणपत ढाकणे
2. श्री.दत्तू नामदेव एखंडे
3. श्री. गौतम कचरू थोरात
उपोषण कर्ते सोबत मराठवाडा शिक्षक संघ चे उपाध्यक्ष श्री. ज्ञानोबा वरवटे,केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, जिल्हासचिव संजय येळवंते, कार्याध्यक्ष फरकुंद अली सय्यद मार्गदर्शक श्री.डॉ.मारोती तेगंमपुरे, प्रा राज्यक्रांती वलसे, जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, कोषाध्यक्ष नारायण मुंडे, सेवानिवृत्त शिक्षक गौतम बनसोडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी केदार, कार्याध्यक्ष फरकुंद अली सय्यद, सहसचिव प्रद्युम्न काकड,भागवत काकडे,सोहम बोदवडे,शेख रशीद,संजय चव्हाण,राहुल साळवे,सचिन अंबडकर,गणेश मेहेत्रे , प्रा दत्ता देशमुख, मन्सूर शेख,महिला प्रतिनिधी शिरीन बेगम शहा,प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल,भगवान धनगे इत्यादी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे