pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

“जालना रेल्वे संघर्ष समितीची मागणी – वंदे भारत ट्रेन छत्रपती संभाजीनगरऐवजी जालना येथून सुरू करावी”

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.28

पुढील काही महिन्यांत नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन छत्रपती संभाजीनगर येथून सुरू करण्याचा रेल्वे विभागाचा निर्णय आहे. मात्र ही ट्रेन जालना येथून सुरू करावी, अशी ठाम मागणी रेल्वे संघर्ष समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाषजी देविदान यांनी केली आहे.

जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने हॉटेल विजय विलास येथे सुभाषजी देविदान यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अहमदाबाद व सुरत येथे व्यापारी वर्गाचे नेहमीच व्यवहारानिमित्त काम पडते. मात्र या शहरांसाठी मराठवाड्यातून कोणतीही रेल्वे सोय उपलब्ध नाही. त्यामुळे वंदे भारत ट्रेन जालना येथून सुरू झाल्यास संपूर्ण व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.

तसेच देविदान म्हणाले की, बेंगळुरू व उत्तर भारतात जाण्यासाठीही जालना येथून नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी संघर्ष समिती प्रयत्न करणार आहे.

यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अंकुश राऊत, सदस्य पिपरीये व बालाजी यांचाही व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे