pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा उत्साहात संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.30

काल:दिनांक:२९.०८.२०२५ रोजी मामा मंगल कार्यालय मारतळा येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा संपन्न झाला.. गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून “घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी” या उपक्रमाच्या माध्यमातून आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर १०५०० साधकांना मोफत ग्रंथ देऊन पारायण करण्यास बसविले. या पारायण सोहळ्याचा सांगता सोहळा अनेक साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये मामा मंगल कार्यालय मारतळा येथे आयोजन करण्यात आले होते. परंतु काल नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढगफुटी आणि मुसळधार पाऊस सुरू होता.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही वारकरी परिवारावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी पावसाची पर्वा न करता अनेक तास रस्त्यावर वाहने उभी करून पाऊस ओसरण्याची वाट पाहून पारायण स्थळ गाठलं आणि पारायण सोहळा ठरल्याप्रमाणे शोभायात्रा, ज्ञानेश्वरी पारायण साधुसंताचे मनोगते व महाप्रसाद घेऊन अतिशय उत्साहात सांगता सोहळा संपन्न केला.या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे तेलंगणाभूषण गुरुवर्य नारायण महाराज मधापुरीकर,गुरुवर्य देवगिरीजी महाराज
गुरुवर्य प्रयागगिरीजी महाराज,आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पा. दतराम पा.व्यंकटी पा. बालाजी पा. सल्लागार शिवाजी पांगरेकर, दत्तराम गोरठेकर संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर, सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर,सहसचिव प्रभाकर महाराज पुयड, कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड,सदस्य गुलाबराव पा.उबाळे प्रवीण रौतुलवाड,भगवान पा.रहाटीकर,त्रिमुख पा.एडके बंडू पा.कदम,हरिनाम पा.कदम महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ.अनिताताई पतंगे,कुसुमताई, भाग्यश्रीताई जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंपतराव पा.डाकोरे,निरंजन पा.शिवाजी पा. व सर्व कौडगावकर मंडळी सर्व तालुकाध्यक्ष, मल्टीमिडियाची टीम,पत्रकार बांधव,युवा मिल्ट्री कॅम्पचे सर्व स्वयंसेवक व आम्ही वारकरी परिवारावर प्रेम करणारे जवळजवळ (६०००) सहा हजार सदभक्त यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. असे प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे