राष्ट्रीय पोषण सप्ताह
राष्ट्रीय पोषण सप्ताह
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यांत येतो. पोषण आहाराबाबत सर्व जनतेस माहिती व्हावी व आपण जो आहार ग्रहण करतो तो कसा असला पाहिजे या उद्देशाने जनजागृती केली जाते. प्रत्येक मानवाला आहाराविषयी जागृत असणे आवश्यक आहे. जंकफुड, चायनीजफुड, मॅगी, बॅर्गर इ. आहारामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहे. चुकीच्या आहाराच्या पध्दतीमुळे जास्तीचे वजन (स्थुलता), मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनीचे रोग इ. गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. ऋतुमानाप्रमाणे फळांचा समावेश आहारामध्ये असणे आवश्यक आहे. बालके, किशोरी, गर्भवती माता, स्तनदा माता यांना विशेष आहाराची आवश्यकता असते. त्यांना त्यांच्या प्रकृतीनुसार विशेष आहार ग्रहण केला तर पुढे भविष्यात होणाऱ्या या आजारापासुन मुक्ती मिळते. उदा.ऑनेमिया, नेत्रविकार, स्मृतीभ्रंश, हाडांचे विकार, व्हिटामीन, प्रोटीन, कॅलीशियम कमतरता, दैनंदिन काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा.
संतुलित आहार :- संतुलीत आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरयुक्त सर्व पोषकतत्व असलेल्या अन्नांचे योग्य प्रमाणातः सेवन करणे म्हणजे संतुलित आहार होय. ज्यामुळे काम करण्यांस उर्जा मिळते. शारीरिक, मानसिक व बौध्दिक विकास होतो. प्रतिकारशक्ती वाढते. निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलीत आहार असणे आवश्यक आहे.
स्निग्ध पदार्थ :- दुध,लोणी, तुप, मासांहार :- मासे, अंडी, मटण, चिकन योग्य प्रमाणात.
फळे भाजीपाला :- सफरचंद, किवी, केळी, पेरु, चिकु, भेंडी, पालक, गोबी, भोपळा, टमाटे, बटाटे, बिट रुट, मुळा, हिरव्या पालेभाज्या. कडधान्य व तृणधान्य :- ज्वारी, गहु, बाजरी, नाचणी, तांदुळ, मटकी, मुगदाळ, उडददाळ, तुरदाळ, चवळी.
कुपोषण :- भारतामध्ये कुपोषणाची समस्या प्रचंड प्रमाणातः आढळुन येते. कुपोषण म्हणजे वाईट पोषण. कुपोषण मध्ये ग्रेड 1,2,3 प्रकार आहेत. कुपोषण बालकामध्ये आढळुन येतो. बालकांचे वाढते वय लक्षात योग्य आहाराचे नियोजन करणे अपेक्षित आहे. गरिबी, उपासमार, अन्नाचा दुष्काळ यामुळे कुपोषण समस्या गंभीर होते. यासाठी शासनामार्फत अंगणवाडीमध्ये बालकांना पोषक आहार देण्यात येतो.
प्रतिबंध :- आहारामध्ये संतुलित आहाराचा समावेश असावा. जंकफुड, मॅगी, बॅर्गर इ.समावेश असु नये. भरपुर पाणी प्यावे. मधुमेह, हदयविकार रुग्णांनी आहारतज्ज्ञांनाकडुन दैनंदिन आहाराचे नियोजन करुन घ्यावे व त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे. बॉडी मास इंडेक्सची (बी.एम.आय.) तपासणी नियमित करावी. गर्भवती माता, स्तनदा माता व बालके यांच्या संतुलीत आहाराबाबत जनजागृती होणे आवश्यक. ॲनेमिया मुक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणुया,
श्री. जयश्री भुसारे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना


