pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

तिथी भोज उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जेवण.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

प्रतिनिधी/विशाल देशमुख,दि.17

टेंभुर्णी हारपाळा ता. जाफराबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिथी भोज कार्यक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक तथा जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे संचालक गणेश फुकट यांच्याकडून सोमवारी ता.१५ पुरी,भाजी,जिलेबी चे जेवण देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तिथी भोज हा उपक्रम राबविण्यात येतो यामध्ये महिन्यातून एकदा गावातील दानशूर, शिक्षण प्रेमी नागरिक यांच्याकडून विद्यार्थ्यांना मिष्ठान्न किंवा जेवण देण्यात येते. यावेळी डॉ राजेंद्र पवार, पंजाबराव बोरगावकर, सुखदेव वरगणे, जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे संचालक किरणकुमार तिडके, अनंथा जंजाळ, विनोद घोडेस्वार, किसन फुकट, कुणाल येळवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज पाटील, श्रीमती लता लहाने, श्रीमती दीपा वाकोडे यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे