pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि 18
भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने गुरुवार, दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती मोती तलावात बसविण्याच्या मागणीसह बोधगया येथील महाबोधी महाविहार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.

दरम्यान, बोधगया येथील महाबोधी महाविहार हे भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्यात यावे, 1949 चा कायदा रद्द करण्यात यावा, नागपूर येथील दीक्षा भूमीची जागा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आंबेडकरी घराण्याच्या नावाने दिली आहे. मात्र, आजपर्यंत स्मारक समितीने ती ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे ती जागा आंबेडकरी घराण्याच्या ताब्यात देण्यात यावी, महू येथील आंबेडकर स्मारकाचे व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावे, तसेच जालना येथील मोती तलावात भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बसविण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात आंबेडकरी समाजासह महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदरील आंदोलन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेश सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भंते राजरत्न, महेंद्र बनकर, दीपक डोके, महेंद्र रत्नपारखे, हरीष रत्नपारखे, गौतम वाघमारे, विष्णू खरात, माधव पात्रे, कुणाल दहिवाले, मीना झिने, समाधान खरात, दिनकर मगरे, बाबुराव साळवे, मिलिंद मगरे, सूर्यभान घोरपडे, गौतम हिवाळे, कांता बोर्डे, ज्योतीताई खरात, राजकुमार खरात, विनोद जाधव, अंकुश लांडगे, देविदास पैठणे, प्रकाश राऊत, करुणा साळवे, कल्पना वेलदोडे, सखाराम काळे, सखाराम कोळे, कुलदीप गरड, सुरेश काळे, अशोक लबडे, प्रशिक सम्राट, शेषराव सोनवणे, मालती घोरपडे, प्रमोद हिवाळे, गुमनराव पारखे, भारत घोरपडे, कमलकिशोर जोगदंड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

मोती तलावात भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बसविण्याची मागणी गेल्या तीस वर्षांपासून होत आहे. मात्र शासन आणि प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे हे काम अद्याप झालेले नाही. आतापर्यंत बी.एम. साळवे, शेषराव जाधव यांच्यासह अनेकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. हुसैन सागर च्या धर्तीवर ठराव घेऊन बुद्धमूर्ती बसविण्यात यावी, असा विचार झाला होता. परंतु त्यावर कुणीही चर्चा करण्यास तयार नाही, तसेच स्मारक नेमके कसे असेल हेही स्पष्ट केले जात नाही. अजिंठा आणि जालना हे जवळ असल्याने तसेच जालना-जळगाव रेल्वेमार्ग तयार होत असल्याने जालना येथे बौद्ध सर्किट तयार होण्यास मोठी चालना मिळेल. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न निर्माण होईल, असे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनावेळी समता सैनिक दलाचे जवान उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे