pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील हेमाडपंथी महादेव मंदीरात आणि सभामंडपात मांस आढळल्याने गावात तणावाचे वातावरण

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

भोकरदन/प्रतिनिधी, दि.21

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील हेमाडपंथी महादेव मंदीरात आणि सभामंडपात शुक्रवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी शिवभक्तांना मास आढळले यामुळे आन्वा गावात एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती पारध पोलीसांना कळविण्यात आली.पोलीसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सुभाष बाबुराव हजारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.या घटने नंतर हिंदूत्व वादी संघटना आक्रमक झाल्या असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनेच्या निषेधार्थ आन्वा आणि आन्वा पाडा दोन्ही गावात कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला.शनीवारी भोकरदन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी आन्वा येथे भेट देऊन शांतता समितीची बैठक घेऊन गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना किरण बिडवे यांनी दिले. मंदीर परीसरात मांसविक्री चे दुकान असुन मास विक्रीचे दुकाने बंद करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे