टेंभुर्णी स्थानिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शेख साबेर सचिव पदी प्रल्हाद जाधव यांची निवड.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23
नुकताच्या झालेल्या बैठक मध्ये टेंभुर्णी येथील स्थानिक पत्रकार संघाची कार्यकारणी सर्वानुमते नक्की करण्यात आली. या वेळी येथील जेष्ठ पत्रकार पी जी तांबेकर यांच्या अध्यक्षते खाली व निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून गणेश भिसे यांच्या मार्गदर्शन खाली सगळी नवीन कार्यकारणी नक्की कार्यकारणी करण्यात आली.या वेळी येथील तरुण पत्रकार शेख साबेर यांची अध्यक्ष म्हणून तर सुनील जोशी यांची उपाध्यक्ष व दैनिक सामानाचे प्रतिनिधी प्रल्हाद जाधव यांची सचिव म्हणुन निवड करून राहिलेली कार्यकारणी घोषित केली.
या वेळी जेष्ठ पत्रकार रावसाहेब अंभोरे,अलकेश सोमाणी,संजय राऊत दत्ता देशमुख शेख नसीम, पी जी तांबेकर यांनी आपली मनोगत समोर ठेवली.जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी ही मोठी बाजार पेठ आहे तालुक्यातील राजकीय इतर घडामोडी येथे नित्य नियम घडत राहतात या मुळे येथील पत्रकार संघाची भूमिका खूप महत्वाची असते. या मुळे सर्वांनी या वेळी सामाजिक राजकीय व आर्थिक बाबीवर या सर्व येणाऱ्या बातम्या मुळे नक्कीच फरक पडतो या मुळे येणाऱ्या काळात सर्वांनी एक नियम दिले असून दिलेली आचार सहिता योग्य प्रकारे करण्याची या वेळी सर्व पत्रकार संघाने नक्की केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार पि जी तांबेकर,अलकेश सोमाणी,गणेश भिसे,रावसाहेब अंभोरे,विनोद कळंबे,नसिम शेख,संजय राऊत,दत्ता देशमुख, सुनिल भाले, फकरू कुरेशी,बालाजी शेवाळे,शेख अश्पाक विष्णु मगर, अशोक पाबळे,गणेश भिसे,गजानन शेळके, यादी पत्रकार उपस्थित होते.


