pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अतिवृष्टी मुळे नदीला पूर येऊन कुंबेफळ सिंदखेड गावाचा मुख्य रस्त्याशी तसेच शहराशी संपर्क तुटला.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि 23

जालना —तालुख्यातील कुंबेफळ सिंदखेड हे गाव मराठवाडा आणि विदर्भ या सिमेवर असून दीड ते दोन हजार लोकसंख्या आहे. गावातील अनेक जण शहरात व्यवसाय निम्मित तसेच कामगार कामा निम्मित जात असतात. तसेच वाघरूळ जहागीर या गावात शिक्षण घेण्यासाठी अनेक विध्यार्थी दररोज जाणे येणे करीत असतात.
परंतु अनेक वर्षांपासून या गावाचा रस्ता पूर्ण पणे उखडला असून, पावसाळा मध्ये या गावातील नागरिकांना खूप मोठया अडचणीला सामोरे जावे लागते. रस्त्या च्या मध्ये नदी असून त्यावर अनेक वर्षा पासून पूल नसल्या मुळे विध्यार्थी, कामगार, व व्यवसायिक यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागते.
लोक प्रतिनिधी तसेच प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची गरज आहे. पाच पंच वार्षिक खासदार राहिलेले आणि आता आमदार असलेले रावसाहेब दानवे यांनी अनेकवेळा पूल बनवून देण्याचा शब्द दिला होता, परंतु त्यांनी पुलाच्या बाबतीत कोणतेच काम केलेले नसल्याचे दिसून येते.
लोकप्रतिनिधी नी याकडे जातीने लक्ष घालून कुंबेफळं सिदखेड गावाचा रस्ता आणि पूलाच काम ताबडतोब सुरु करावे. नसता लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा, सामाजिक कार्यकर्ते व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र गाडेकर यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे