महसुल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचे दरपत्रक शासनाकडून जारी
जालना/प्रतिनिधी,दि.26
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क् अधिनियम 2015 अन्वये महसुल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचे दरपत्रक व अपिलाची माहितीची जनजागृती करण्यासाठी महसूल विभागाने या सेवा व दराची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे. खालीलप्रमाणे सर्व सेवा नागरिकांना निर्धारीत वेळेत व निश्चित दरामध्ये प्राप्त होणार आहे.
या सेवा मिळण्याचा कालावधी व दर पुढीलप्रमाणे असणार आहे. यामध्ये वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र सेवा मिळण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी असुन, रु. 69 दर असणार आहे. तसेच जातीचे प्रमाणपत्र सेवेसाठी 45 दिवस कालावधी तर दर रु. 128 असणार आहे. उत्पन्न प्रमाणपत्र सेवेसाठी 15 दिवस कालावधी दर रु.69, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सेवेसाठी 21 दिवस कालावधी तर दर रु.128, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र सेवेसाठी 7 दिवसाचा कालावधी तर दर रु. 69, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र सेवेसाठी 7 दिवसाचा कालावधी तर दर रु. 69, ऐपतीचा दाखला सेवेसाठी 21 दिवसाचा कालावधी तर दर रु. 69, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना सेवेसाठी 7 दिवस कालावधी तर दर रु. 69, अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत सेवेसाठी 157 दिवस कालावधी तर दर रु. 69, अल्पभु धारक दाखला परवाना सेवेसाठी 15 दिवस कालावधी तर दर रु. 69, भूमीहीन शेतमजुर असल्याचा दाखला सेवेसाठी 15 दिवस कालावधी तर दर रु. 69, शेतकरी असल्याचा दाखला सेवेसाठी 15 दिवस कालावधी तर दर रु. 69, डोंगर/दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र सेवेसाठी 7 दिवस कालावधी तर दर रु. 69 आणि प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे सेवेसाठी 1 दिवसाच कालावधी तर रु. 69 दर असणार आहे.
उद्योजकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 44 (अ) च्या तरतुदीनुसार परस्पर औद्यागिक वापर सुरु करणे शक्य व्हावे, त्याकरीता आवश्यक अधिकृत माहिती तातडीने उपलब्ध करुन देणे सेवा मिळण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी असणार असून यासाठी रु. 69 दर असणार आहे. तसेच औेद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी (गौण खनिज उत्खनन) सेवा मिळण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी तर दर 69 रु. असणार आहे. औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरण्या कामे बिगर अधिसुचित वृक्षतोड परवा सेवा मिळण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी तर दर 69 रुपये असणार आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता, 1966 च्या कलम 42-अ (1) (अ) अन्वये भोगवटदार वर्ग-1 या धारणाधिकाराच्या जमिनी संदर्भात नियोजन प्राधिकरणाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अर्जातर्गंत जमिनीचा वर्ग, जमिनीचा भोगवटदार व त्यावरील भार इत्यादीचे विनिश्चिती प्रमाणपत्र देणे सेवेसाठी 30 दिवसाचा कालावधी असुन दर रु. 69 असणार आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता, 1966 च्या कलम 42-अ (1) (ब) राज्यात अंमलात असलेले शेतजमीन व कुळवहिवाट अधिनियम विविध वतन अधिनियम आणि महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादात्र) अधिनियम, 1961 या अधिनियमानुसार वाटप केलेल्या भोगवटदार वर्ग 2 या धारणाधिकाराच्या जमिनीकरीता भोगवटादाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासुन विकास परवानगी मिळविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या सेवेसाठी 30 दिवस कालावधी आणि 69 रुपये दर असणार आहे.
तसेच महाराष्ट्र जमीन महसुल संहिता, 1966 च्या कलम 42-अ अन्वये संबंधित व्यक्तीने प्राप्त केलेल्या विकास परवानगीच्या अनुषंगाने व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या लेखी माहितीच्या आधारे आणि कलम 47 अ मध्ये नमुद भरणा केल्यावर संबंधित व्यक्तीला विहित नमुन्यामध्ये सनद देणे सेवेसाठी 30 दिवस कालावधी आणि 69 रुपये दर असणार आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


