खानापूर वरखेडा फिरंगी ग्रामपंचायत चा अभ्यास दौरा.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.27
टेंभुर्णी खानापूर वरखेडा फिरंगी ता.जाफराबाद. ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श गाव पाटोदा या ठिकाणी अभ्यास दौरा करण्यात आला यावेळी आदर्श गाव पाटोदा चे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना त्यांनी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. या दौऱ्यामध्ये सहभागी असणाऱ्या महिलांनी पाटोदा गावातील सांडपाणी व्यवस्थापन,कचरा व्यवस्थापन ,पक्के रस्ते रस्त्याच्या दोन्ही कडेने पेव्हर ब्लॉक आणि गावातील हिरवळ, वृक्ष लागवड या बाबींची माहिती घेतली. यावेळी ग्रामपंचायत खानापूर/वरखेडा फिरंगी येथील सरपंच शेषराव जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके,सदस्य दिपाली ऋषिंद्र शेळके, वंदना पंढरी तायडे, गयाबाई रामचंद्र गोरे, मंगल निवृत्ती जाधव, रेखा ज्ञानेश्वर शेळके, यशोदा संतोष जाधव यांच्यासह गावातील महिला शारदा प्रदीप शेळके, विद्या दत्तू शेळके, छाया शंकर शिंदे, लक्ष्मी गुलाबराव शेळके, लक्ष्मी बालाजी शेळके ,अरुणा सुनील शेळके, शकुंतला एकनाथ शेळके, नंदा मधुकर शेळके, सुमन बबन बर्डे ,उषा विलास शेळके, लता बळीराम शेळके, लीला किसन शेळके, मंदाबाई सुभाष मोरे, सविता जाधव, गीता गोरे, तुळसा तिडके, रुखमन वाघमारे, आशा बोर्डे,कल्याणी तायडे, नीता हिवरे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग आशाताई, अंगणवाडी ताई मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


