pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

गुणीवंतांचा व स्थानिक पत्रकार संघाचा मानव सेवा मंडळा कडून सत्कार.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.28

टेंभुर्णी स्थानिक पत्रकार संघाचा नवीन कार्यकारणीचा नुकताच एका छोट्या खाणी कार्यक्रमात मानव सेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी स्थानिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिक्षक शेख साबेर,उपाध्यक्षपदी सुनील जोशी व सचिव पदी प्रल्हाद जाधव यांची नुकतीच निवड झाली त्याबद्दल त्यांचा येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात एका छोट्याखाणी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सोबत येथील रील स्टार प्रताप नवले यांनी नुकतीच “भावी सरपंच” म्हणून एक शॉर्ट फिल्म बनवले त्यामुळे या भागातील एक पत्रकार मित्र आपल्या कल्पनेतून पुढे जात असून नावलौकिक मिळत आहे याबद्दल रिअल स्टार प्रताप नवले व तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणीत विष्णू मगर यांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
येथील सार्वजनिक महात्मा फुले वाचनालय येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार पी जी तांबेकर सिताराम भाले शेख साबेर प्रल्हाद जाधव सुनील जोशी प्रताप नवले रावसाहेब अंभोरे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी मानव सेवा मंडळाच्या वतीने संजय राऊत अलकेश सोमाणी रावसाहेब अंभोरे शेख नसीम यांनी आपले मनोगत मांडत या सर्वांचे अभिनंदन केले.या वेळी संजय निकम गजानन डोमळे बालाजी शेवाळे ज्ञानेश्वर उखर्डे अशोक पाबळे गोविंद जाधव, विष्णू जोशी,सुनिल भाले,शेख अर्शद, सोमनाथ अंधारे, सुनील अंभोरे, साई बोर्डे, बी डी सवडे लक्ष्मण धारे, यांच्या सह पत्रकार आणि मानव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या सत्कार ला उत्तर देता वेळी दिलेल्या जबाबदारीचे चे योग्य पालन करून पदाला न्याय देण्याची भूमिका शेख साबेर प्रताप नवले प्रल्हाद जाधव सुनील जोशी यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे