pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

नियत वयोमानानुसार प्रा. डॉ.एस.डी.एरंडे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.4

जाफराबाद येथील सिद्धार्थ कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.डी. एरंडे यांचा नियत वयोमानानुसार सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दादासाहेब म्हस्के यांच्या शुभहस्ते सेवा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख होते तर विचार मंचावर महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रो. डॉ.सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रो.सुनील मेढे यांनी केले तर सेवानिवृत्त प्रा. डॉक्टर एस.डी.एरंडे यांचा यथोचित सत्कार मा.दादासाहेब मस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ.एरंडे यांच्या सोबत घालवलेल्या सहवासात आपले मनोगत व्यक्त केले डॉ.एस. डी.एरंडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयांमध्ये 33 वर्षे सेवा कार्यकाळ पूर्ण केला असून त्यांनी या महाविद्यालयाच्या मार्फत जाफराबाद तालुक्यातील तथा परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तथा सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे गौरवउद्गार संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के यांनी काढले .सत्काराला उत्तर देताना डॉ. एरंडे यांनी गेल्या 33 वर्षापासून सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये कार्य करत असताना त्यांना जे काही अनुभव आले ते कथन केले व शेवटी मला मा. दादासाहेब यांनी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी डॉ. एरंडे यांच्या बाबतीमध्ये सांगितले की, आम्ही दोघे एकाच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले असून मा. दादासाहेबांच्या आशीर्वादामुळे एकाच महाविद्यालयांमध्ये सेवा कार्य बजावले आहे परंतु डॉ. एरंडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी.पैठणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस.टी. साळवे यांनी मानले कार्यक्रमास कनिष्ठ, वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा डॉ. एस.डी. एरंडे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे